ग्राहकाने १४ वेळा केली भांगेच्या गोळीची मागणी

ग्राहकाची खोड काढत झोमॅटोचे ट्विट, यावर दिल्ली पोलिसांचे सूचक उत्तर

ग्राहकाने  १४ वेळा केली भांगेच्या गोळीची मागणी

आज होळी सणाच्या निमित्ताने व्हाट्सअँप, इन्स्टा, एफबीवर आपण वेगवेगळे संदेश बघतो.  ” कृपया गुरगावच्या शुभमला कुणीतरी सांगा कि, आम्ही भांगेच्या गोळ्या पोचवत नाही”.तर त्याचे झाले असे कि,  एका ग्राहकाने झोमॅटो या अँपवर गुरगावच्या एका शुभम नावाच्या ग्राहकाने भांगेची गोळी मिळेल का? असे १४ वेळा विचारल्याचे लिहिले आहे. त्यावर झोमॅटोने ट्विट करत हे  लिहिले आहे. तर झोमॅटो या अँपच्या या ट्विटवर तीन तासांमध्ये ८६००० पेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. शिवाय खूप साऱ्या छान छान प्रतिक्रिया पण आल्या आहेत.

मराठी महिन्याच्या शेवटच्या सणाचा होळीचा आनंद आपण लहान थोर सगळेच जण कुटुंबासोबत साजरा करतो. रंगांचा हा सण साजरा करायला सगळे उत्सुक असतात.पुरणपोळी,कटाची आमटी, थंडाई, मिठाई, हे सर्व आपण या सणाच्या निमित्ताने मजा घेतो. काही ठिकाणी या सणाला लोक  भांग  पण घेतात. याच अनुषंगाने, आज होळी सणाच्या निमित्ताने आपण सगळेच सोशल मीडियाचा वापर हा सणांचा आनंद एकमेकांसोबत वाटून घेतो आणि काही चांगले संदेश आपण एकमेकांना देतो. सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे.

हे ही वाचा:

आनंद द्विगुणित करणारा रंगांचा सण “होळी”

‘पर्यावरणपूरक’ रंग वापरून होळी साजरी करा

औरंग्या बुडाला पण पिलावळीचं काय?

माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्या घरी एसीबीची छापेमारी

एका यूजरने यावर लिहिले आहे कि, बंगलोरमध्ये बसलेल्या रोहितला तुमच्या या ट्विटरवरून स्टार्टअपची कल्पना सुचली. तर दुसऱ्या एका युजरने आम्ही सर्वजण होळीच्या दिवशी ‘शुभम’ आहोत असे लिहिले आहे. या शिवाय काही युजरने ‘नोटेड’ असे , तर काहींनी ‘काळजी करू नका’ असे सुद्धा लिहिले आहे.  पण. या मध्ये दिल्ली पोलिसांनी या पोस्टच्या रीट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

 

दिल्ली पोलिसांनी पोस्ट पुन्हा शेअर करत त्याला एक मनोरंजनात्मक टिप्पणी केली आहे. जर कोणी शुभमला भेटल्यास त्याला सांगा कि, “त्याने भांग घेतल्यास गाडी चालवू नये”. हि पोस्ट दिल्ली पोलिसांनी रिट्विट केल्यावर सुद्धा त्यांना ४३००० मिळाले आहेत याशिवाय, या ट्विटला ५४० पेक्षा जास्त लाईक्स सुद्धा दिसून येत आहेत. पण आज झोमॅटो या फूड डिलिव्हरी अँपचे एक खोडकर ट्विट आणि त्यावर दिल्ली पोलिसांनी समयसूचकतेचे ट्विट आजच्या सणाला वेगळाच रंग आणतो.

 

Exit mobile version