27 C
Mumbai
Saturday, May 10, 2025
घरदेश दुनिया“आपण हिंदूंपेक्षा वेगळे...” पाकचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर बरळले

“आपण हिंदूंपेक्षा वेगळे…” पाकचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर बरळले

द्वि-राष्ट्र सिद्धांताचा मुद्दा केला उपस्थित

Google News Follow

Related

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी द्वि-राष्ट्र सिद्धांताचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगवेगळे राष्ट्र आहेत यावर भर दिला आहे. बुधवारी इस्लामाबादमधील ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शनमध्ये भाषण देताना, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मुलांमध्ये राष्ट्र कसे जन्माला आले हे सांगण्याचे आवाहन केले.

मुनीर म्हणाले की, “आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की, आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपला धर्म वेगळा आहे. आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत. आपल्या परंपरा वेगळ्या आहेत. आपले विचार वेगळे आहेत. आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. हा द्वि-राष्ट्र सिद्धांताचा पाया होता. आपण एक नाही तर दोन राष्ट्रे आहोत या श्रद्धेवर तो रचला गेला होता,” असे जनरल मुनीर म्हणाले. पुढे ते म्हणाले तुम्ही तुमच्या मुलांना हे सांगायला हवे जेणेकरून ते पाकिस्तानची कहाणी कधीही विसरणार नाहीत.

लष्करप्रमुखांनी पुढे म्हटले की, पाकिस्तानच्या मागील पिढ्यांनी देश निर्माण करण्यासाठी अविरत संघर्ष केला आहे. पूर्वजांनी अपार त्याग केला आहे आणि त्याचे रक्षण कसे करायचे हे आपल्याला माहिती आहे, असे ते म्हणाले. पुढच्या पिढीला पाकिस्तानची कहाणी सांगायला विसरू नका, जेणेकरून त्यांचे पाकिस्तानशी असलेले नाते कधीही कमकुवत होणार नाही, असं जनरल मुनीर म्हणाले.

हे ही वाचा..

ममता बनर्जींमध्ये ‘ममता’ नाही !

रॉबर्ट वाड्रा म्हणाले, कितीही वेळा बोलावले तरी जाऊ

नॅशनल हेराल्ड प्रकरण : गुजरातमध्ये भाजपचा ‘हल्ला बोल’

दिल्लीत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘आयुष्मान कार्ड’

दहशतवाद्यांच्या दहा पिढ्याही बलुचिस्तान आणि पाकिस्तानला हानी पोहोचवू शकत नाहीत, असे जनरल मुनीर यांनी बलुचिस्तानमधील बंडखोरांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पुढे ते म्हणाले की, लवकरच दहशतवाद्यांचा पराभव करू. पाकिस्तानच्या शत्रूंना असे वाटते की मूठभर दहशतवादी पाकिस्तानचे भवितव्य ठरवू शकतात? दहशतवाद्यांच्या दहा पिढ्याही बलुचिस्तान आणि पाकिस्तानला हानी पोहोचवू शकत नाहीत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
247,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा