स्वातंत्र्यदिनानिमित्त पोस्ट केलेल्या पाक क्रिकेट संघाच्या व्हिडीओत इम्रानच होता गायब…

पाकिस्तानचा माजी खेळाडू वसिम अक्रमने डागले टीकास्त्र

स्वातंत्र्यदिनानिमित्त पोस्ट केलेल्या पाक क्रिकेट संघाच्या व्हिडीओत इम्रानच होता गायब…

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पोस्ट केलेल्या एका व्हिडीओनंतर घराचा आहेर मिळाला असून लोकांनी पीसीबीवर टीका केली आहे. पीसीबीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता. पाकिस्तान क्रिकेट संघाचा इतिहास यामध्ये मांडण्यात आला होता. मात्र, या व्हिडीओमध्ये महत्त्वाचा खेळाडूच नसल्यामुळे पाकिस्तानचा माजी खेळाडू वसिम अक्रम याच्यासह अनेकांनी टीका केली आहे.

पीसीबीने पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनादिवशी पाकिस्तानी क्रिकेटचा इतिहास मांडणारा व्हिडीओ ट्वीट केला होता. यातून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि खेळाडू इम्रान खान यांना वगळण्यात आले होये. इम्रान खान यांना व्हिडिओतून वगळण्याचं नेमकं कारण अजून उघड झालेलं नाही. मात्र, त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओनंतर सर्वच स्तरावरून टीकेची झोड उठली. पीसीबीच्या १४ ऑगस्टच्या व्हिडिओवर पाकिस्तानचा माजी खेळाडू वसिम अक्रम याने जोरदार टीका केली होती.

वसिम अक्रम याने ट्विट करत म्हटले की, “मोठ्या विमानप्रवासानंतर मी श्रीलंकेत पोहचलो. त्यानंतर पीसीबीचा व्हिडिओ पाहताना मला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला. पाकिस्तानच्या इतिहासाच्या या छोट्या व्हिडिओतून इम्रान खान यांनाच वजा करण्यात आले आहे. राजकीय मतभेद हे एका बाजूला मात्र इम्रान खान हे जागतिक क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू आहेत. त्यांनी त्यांच्या काळात पाकिस्तानचा मजबूत संघ तयार केला होता. त्यांनी आम्हाला पुढचा मार्ग दाखवला. पीसीबीने हा व्हिडिओ डिलीट करून माफी मागयला हवी.”

हे ही वाचा:

नौदलाची ताकद वाढणार; पाच फ्लीट सपोर्ट जहाजे मिळणार

रशियाचे ‘लुना-२५’ भारताच्या ‘चांद्रयान- ३’ च्या दोन दिवस आधी पोहचणार

‘मेक इन इंडिया’मुळे मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर

दिल्लीवरून ‘इंडिया’मध्ये संघर्ष

या व्हिडीओवर टीका होऊ लागल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली चूक सुधारत नवा एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. हा नवीन व्हिडिओ शेअर करत त्यात खुलासा केला की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वनडे वर्ल्डकप २०२३ च्या निमित्ताने एक प्रमोशनल कॅम्पेन सुरू केलं आहे. त्यासाठी एक व्हिडिओ १४ ऑगस्ट २०२३ रोजी ला अपलोड करण्यात आला होता. त्याच्या लेंथमुळे हा व्हिडिओ छोटा करण्यात आला होता. त्यात काही महत्वाच्या क्लिप नव्हत्या. ही गोष्ट नव्या व्हिडिओत बदलण्यात आली आहे.

Exit mobile version