24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरदेश दुनियामध्य पूर्वेकडील देशांवर युद्धाचे सावट

मध्य पूर्वेकडील देशांवर युद्धाचे सावट

इराणच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचीही अन्य आघाड्यांवर सज्जता

Google News Follow

Related

इस्रायलने गाझा पट्टीमधील लष्करी कारवाई सुरूच राहील, असे सांगतानाच अन्य भागांतील युद्धासाठी आम्ही तयारी करत असल्याचे सूतोवाच इस्रायलने केले आहे. इराणने १ एप्रिल रोजी इस्रायलवर हवाईहल्ल्याचा इशारा दिल्यानंतर इस्रायलनेही सज्जता केली आहे. त्यामुळे मध्य पूर्वेकडील देशांत युद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अन्य सहा लष्करी अधिकारी ठार झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह अली खामेनी याने इस्रायलवर हल्ला ‘अपरिहार्य’ असल्याचे म्हटले होते. दमास्कसमधील इराणच्या दूतावासावरील हल्ल्यामागे आपण असल्याची कबुली इस्रायलने दिलेली नाही. मात्र हा हल्ला इस्रायलने केल्याचा दावा पँटागॉनने केला होता.

इराणच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर इस्रायलनेही जय्यत तयारी सुरू केली आहे. ‘आम्ही संरक्षण आणि हल्ला या दोन्ही बाजूंनी इस्रायलची सुरक्षाव्यवस्था चोख करण्याची तयारी करत आहोत,’ असे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. तिकडे जर्मनीच्या लुफ्थान्सा एअरलाइननेही तेहरानला जाणारी सर्व विमानसेवा १३ एप्रिलपर्यंत रद्द केल्याचे जाहीर केले आहे. हवाईसेवेतील कर्मचाऱ्यांना तेहरानमध्ये रात्र घालवावी लागू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले. ऑस्ट्रेलियाने तेहरानची विमानसेवा सुरू ठेवली असली तरी हवाई कर्मचाऱ्यांना तेहरानला रात्रभर राहावे लागू नये, अशा प्रकारे वेळेचे नियोजन केले आहे.

जर्मनीचे परराष्ट्र मंत्री ऍनालेना बीआरबॉक यांनी या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा करून जबाबदारीने वागण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा:

सहा विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हरयाणा शाळेला नोटीस

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपमध्ये प्रवेश!

तिकीट मिळाले नसल्याने राजीनामा दिलेल्या निशा बांगरे यांचा पुन्हा नोकरीसाठी अर्ज

‘भारत-चीन यांच्यातील प्रदीर्घ सीमावादावर तातडीने लक्ष देण्याची गरज’

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या नागरिकांना मध्य पूर्वेकडील देशांमध्ये विशेषतः इस्रायल, लेबेनॉन आणि पॅलेस्टिनी भागांत जाऊ नये, असे आवाहन केले आहे. तसेच, मध्य पूर्वेकडील देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. ‘या भागातील परिस्थिती पूर्णपणे अस्थिर होऊ नये, यासाठी प्रत्येकाने संयम बाळगण्याची आवश्यकता आहे,’ असे आवाहन रशियाने केले आहे. त्याचवेळी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैसी यांनी हमासचा म्होरक्या इस्माइल हनियेह यांच्या तीन मुलांच्या हत्येचा निषेध केला आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, इराण इस्रायलवर थेट हल्ला करण्याची शक्यता नाही आणि ते हल्ले करण्यासाठी लेबनॉनमधील हिजबुल्लाह आणि येमेनमधील हौथीसारख्या प्रॉक्सी गटाचा वापर केला जाऊ शकतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा