अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, त्यांना या आठवड्याच्या शेवटी युक्रेनमधील संभाव्य युद्धविरामावर रशियाकडून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. हे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांच्यात झालेल्या फोनवरच्या संवादानंतर काही तासांतच समोर आले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, या आठवड्यात, खरंतर फार लवकर रशियाकडून आम्हाला काही चांगले ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करतो. मला वाटते की, आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत, पण लवकरच आपण आपल्याला सविस्तर माहिती देऊ.”
रशियन परराष्ट्र मंत्रालयानुसार, लावरोव यांनी यूक्रेनमधील संघर्षावर मूळ कारणांचा व्यापक तोडगा शोधण्यासाठी अमेरिकन समकक्षांबरोबर सहकार्य सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली आहे. दरम्यान, पॅरिसमध्ये उपस्थित असलेल्या मार्को रुबिओ यांनी रशियन अधिकाऱ्यांना फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली.
तूर्तास ते शक्य नाही
संयुक्त राष्ट्रांमधील रशियाचे राजदूत वसीली नेबेन्झ्या यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत युक्रेनमध्ये युद्धविराम “अवास्तविक” आहे, कारण कीव ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले थांबवण्यात अपयशी ठरले आहे. “आम्ही ऊर्जा पायाभूत सुविधांबाबत मर्यादित युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता, पण युक्रेनने त्याचे पालन केले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत युद्धविरामाबाबत बोलणे ही वस्तुस्थितीपासून फार दूरची गोष्ट आहे.”
हे ही वाचा:
छत्तीसगडमध्ये ३३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; १७ जणांवर ४९ लाखांचे बक्षीस
अमेरिकेने येमेनमधील इंधन बंदरावर केलेल्या हल्ल्यात ३८ ठार
नाशिक दंगल प्रकरणी एमआयएमचे शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना अटक!!
आवाज नव्हे उबाठाच कृत्रिम झालाय!
३० दिवसांचा प्रस्ताव आणि त्याचे उल्लंघन
१८ मार्च रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संघर्ष करणाऱ्या दोन्ही बाजूंना ३० दिवस ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले न करण्याचा प्रस्ताव दिला होता.
-
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या प्रस्तावाला तत्काळ मान्यता दिली आणि सेनेला तशी सूचना केली.
-
त्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला.
तथापि, १८ मार्च ते १६ एप्रिल दरम्यान युक्रेनने १५ भागांमध्ये रशियन ऊर्जा स्थळांवर हल्ले केले. हे हल्ले ड्रोन, HIMARS आणि इतर तोफखान्यांचा वापर करून करण्यात आले.
रशियाचा आरोप: युद्धविरामाचे उल्लंघन सुरूच
रशियन सरकारी वृत्तसंस्था ‘तास’ने शुक्रवारी सांगितले की, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी आरोप केला की, कीवने युद्धविरामाचे पालन केले नाही आणि अजूनही रशियन ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ल्याचा प्रयत्न सुरू आहेत.