भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाच्या राजधानीचे शहर असलेल्या मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून साऱ्या जगाचे लक्ष या भेटीकडे लागून राहिले होते. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढील महिन्यात रशियात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी वैयक्तिकरित्या निमंत्रित केले आहे. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठकीचा प्रस्ताव ठेवला आहे.
माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे अजित डोवाल यांची भेट विविध मुद्द्यांवर चर्चा केली. भारत- रशिया देशांचे परस्पर संबंध, रशिया- युक्रेन युद्ध आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. या भेटीवेळी पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिक्स शिखर परिषदेचं निमंत्रण दिलं. तसेच ब्रिक्स परिषदेवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी स्वतंत्र द्विपक्षीय चर्चेचं आयोजन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. “आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कझानमध्ये वाट पाहत आहोत. मला असं वाटतं की २२ ऑक्टोबर रोजी आम्ही द्विपक्षीय बैठकीत चर्चा करावी.” असा निरोप पुतीन यांनी नरेंद्र मोदींसाठी पाठवल्याची माहिती आहे. दरम्यान, अजित डोवाल यांनी पुतिन यांना भेटल्यानंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युक्रेन दौऱ्याची माहिती दिली. तसेच रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताच्या भूमिकेची माहिती दिली.
🇷🇺🤝🇮🇳 On September 12, #Russia's President Vladimir Putin had a meeting with Ajit Doval, National Security Advisor to the Prime Minister of #India, at the Konstantinovsky Palace in #StPetersburg.
👉🏻 https://t.co/vFQ64S4vMq#RussiaIndia #DruzhbaDosti pic.twitter.com/KxcD9aciDG
— Russia in India 🇷🇺 (@RusEmbIndia) September 12, 2024
हे ही वाचा:
हवे तर मी खुर्ची सोडते, पण आंदोलन हे सरकार पाडण्यासाठी…
मुस्लिमबहुल ताजिकिस्तानमध्ये हिजाब बंदी; पुरुषांना दाढी ठेवण्यास मनाई
यामिनी जाधवांच्या बुरखा वाटण्यावर भाजप सहमत नाही !
पॅरालिम्पिक पदकविजेत्या अवनीने पंतप्रधान मोदींना दिली भेट !
महिन्याभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचा दौरा केला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी रशिया- युक्रेन युद्धासह जागतिक, प्रादेशिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली होती. तर, काही दिवसांपूर्वीच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी विश्वास दाखवला होता की, भारत, चीन आणि ब्राझील हे देश युक्रेनवरील संभाव्य शांतता चर्चेत मध्यस्थ म्हणून काम करू शकतात.