जगातील पहिल्या एसएमएसचा होणार लिलाव

जगातील पहिल्या एसएमएसचा होणार लिलाव

जगातील पहिला एसएमएस ३० वर्षांपूर्वी पाठविण्यात आला होता. आता याच एसएमएसचा लिलाव होणार आहे. जगातील पहिला एसएमएस हा १४ अक्षरांचा होता. हा एसएमएस डिसेंबर १९९२ मध्ये पाठवण्यात आला होता. त्यानंतर टेलिकॉम क्षेत्रात वेगाने बदल झाला आहे. सध्या संवादाची अनेक माध्यमे उपलब्ध असून एसएमएसचा वापर कमी झाला आहे.

जगातील पहिल्या एसएमएसचा लीलाव २१ डिसेंबर रोजी होणार आहे. फ्रान्समध्ये एगट्स ऑक्शन हाऊसद्वारे (Aguttes Auction House) लिलाव करण्यात येणार आहे. जगातील पहिल्या एसएमएसमध्ये १४ अक्षरे होती. या मेसेजमध्ये “Merry Christmas” असा संदेश होता. हा एसएमएस क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील खरेदी करता येऊ शकतो. या एसएमएसचा जवळपास १ कोटी ७१ लाख रुपयांना लिलाव होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर

उत्तर कोरियाच्या किम जोंगचा रडका निर्णय; कुणीही हसायचे नाही

शिवसेनेला ठेंगा, निधी वाटपात राष्ट्रवादी, काँग्रेसची बाजी

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

जगातील पहिला एसएमएस ३० वर्षांपूर्वी पाठवण्यात आला होता. हा मेसेज व्होडाफोन कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या व्होडाफोनवर पाठवण्यात आला होता. इंजिनियर नील पापवर्थद्वारे हा संदेश रिचर्ड जार्विस यांना पाठवण्यात आला होता. पापवर्थ हे त्यावेळेस टेस्ट इंजिनियर म्हणून व्होडाफोनसाठी शॉर्ट मेसेज सर्व्हिससाठी (एसएमएस) काम करत होते. जगातील पहिला एसएमएस जार्विसच्या ऑर्बिटल ९०१ हँडसेटवर ३ डिसेंबर १९९२ रोजी पाठवण्यात आला होता.

Exit mobile version