रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये भारताचे हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. या दरम्यान युक्रेनच्या मदतीला अनेक टेलिकॉम कंपन्या धावून आल्या आहेत. अनेक कंपन्यांनी युक्रेनमध्ये फ्री आंतरराष्ट्रीय कॉलची घोषणा केली आहे. एटी अँड टी, ड्यूश टेलिकॉम आणि व्होडाफोनसह अनेक टेलिकॉम कंपन्यांनी युक्रेनमध्ये फ्री आंतरराष्ट्रीय कॉलची घोषणा केली आहे.
युरोपियन टेलिकम्युनिकेशन लॉबिंग ग्रुपने (ETNO) सांगितले की, अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, आगामी काळात इतर कंपन्या आणि संस्थांकडूनही अशीच अपेक्षा आहे. युक्रेनमधील मोफत आंतरराष्ट्रीय कॉल्स व्यतिरिक्त रोमिंग शुल्क देखील रद्द करण्यात आले आहे. शुल्क रद्द करणाऱ्या दूरसंचार कंपन्यांमध्ये व्होडाफोन, विवाकॉम, ड्यूश टेलिकॉम, ए१ टेलिकॉम ऑस्ट्रिया ग्रुप, ऑरेंज, टेलिफोनिका, टेलिया कंपनी, टेलिनॉर, प्रॉक्सिमस, केपीएन, टीआयएम टेलिकॉम इटालिया, अल्टीस पोर्तुगाल आणि स्विसकॉम यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
‘काचा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांचा अपघात
ताज महालच्या ‘नो फ्लायिंग झोन’ मधून विमान गेल्याने खळबळ
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरले ईडीचे माजी सहसंचालक
यातील अनेक कंपन्या शेजारील देशांतील निर्वासितांना मोफत सिमकार्ड देत आहेत. याशिवाय निर्वासित शिबिरांमध्ये मोफत वाय-फाय आणि एसएमएस सेवादेखील सुरू आहे. Verizon ने सांगितले की ते १० मार्चपर्यंत लँडलाइन आणि वापरकर्ते किंवा व्यवसायिक वायरलेस फोनवरून आणि युक्रेनमधील कॉलसाठी शुल्क माफ करत आहेत. Verizon ने युक्रेनमधील ग्राहकांसाठी व्हॉइस आणि टेक्स्ट रोमिंग शुल्क देखील काढून टाकले आहे.