अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत असलेले भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी ‘मी हिंदू असल्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरू शकलो,’ असे प्रतिपादन केले आहे. हिंदू धर्म मला स्वतंत्रता प्रदान करतो. शनिवारी, ‘द फॅमिली लीडर’ फोरममध्ये बोलताना विवेक रामास्वामी यांनी भविष्यातील पिढीच्या फायद्यासाठी मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा मनोदय जाहीर केला. तसेच, हिंदू आणि ख्रिश्चन धर्मांच्या शिकवणींमधील समानतेकडेही लक्ष वेधले.
‘माझा विश्वासच मला स्वातंत्र्य देतो. माझा धार्मिक विश्वासच मला या राष्ट्राध्यक्ष मोहिमेपर्यंत घेऊन आला आहे. मी एक हिंदू आहे. मला वाटते, खरा ईश्वर एक आहे. ईश्वराने प्रत्येकाची निर्मिती ठराविक उद्देशांसाठी केली आहे. हे उद्दिष्ट गाठणे हे आपले कर्तव्य आहे, असा माझा धार्मिक विश्वास आहे. ही जणू ईश्वराची विविध उपकरणे आहेत, जी आपल्या माध्यमातून काम करत आहेत. परंतु आपण सर्वजण सारखेच आहोत कारण ईश्वर आपल्या सर्वांमध्ये वास करतो,’ असे रामास्वामी म्हणाले.
हे ही वाचा:
म्हणे – “मुस्लीम दुय्यम नव्हे तर समान नागरिक !”
बीएआरसी वसाहतीत शीतपेय पाजून विद्यार्थीनीवर बलात्कार
निवृत्त आयएएस अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची संपत्ती राम मंदिराला दान
मत्स्य विभाग करणार मत्स्यसाठ्याचे संवर्धन
‘मी एका पारंपरिक घरात जन्मलो आहे. कुटुंब हा पाया असतो, ही शिकवण माझ्या मातापित्यांनी मला दिली आहे. आपल्या आई-वडिलांचा सन्मान करा. लग्न हे पवित्र आहे. लग्नाआधी संयम राखणेच महत्त्वाचे आहे. व्याभिचार करणे चुकीचे आहे. लग्न एक पुरुष आणि स्त्रीमध्ये होते. तुम्ही ईश्वरासमोर विवाह करता आणि ईश्वर आणि कुटुंबाप्रति शपथ घेता,’ अशीही भूमिका त्यांनी मांडली.
अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून अमेरिकेत विश्वास, कौटुंबिक भावना, कठोर मेहनत, देशभक्ती आणि विश्वास पुन्हा निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.