विवेक अग्निहोत्री का म्हणाले, प्रकाश राजना अंधःकार राज

प्रकाश राज यांना विवेक अग्निहोत्रींची   ट्विटद्वारे प्रतिक्रिया.

विवेक अग्निहोत्री का म्हणाले, प्रकाश राजना अंधःकार राज

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट गेल्यावर्षी  प्रदर्शित झाला होता तेव्हा तो अनेकांसाठी चर्चेचा विषय बनला होता काहींनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता हा चित्रपट प्रोपगंडा आणि वल्गर आहे असे चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वक्तव्य केले.होते. याच चित्रपटावर अभिनेते प्रकाश राज यांनी टीका केली आहे. एका कार्यक्रमामध्ये प्रकाशराज यांनी द काश्मीर फाइल्स हा नॉनसेन्स चित्रपट असल्याचे वक्तव्य केले आहे. आता याच वक्तव्यावर एक ट्विट शेअर करून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले प्रकाश राज

विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रकाश राज हे काश्मीर फाइल्स या चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहेत. द काश्मीर फाइल्स हा एक नॉनसेन्स चित्रपट आहे. त्याची निर्मिती हि कोणी केली हे आपणाला माहित आहे. आंतर राष्ट्रीय ज्युरी त्याच्यावर थुंकतात. दिग्दर्शक अजूनही सांगत आहेत मला ऑस्कर का मिळत नाही ? त्याला तर भास्कर पुरस्कार पण मिळणार नाही.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट शेअर करून प्रकाश राज यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे ‘द काश्मीर फाइल्स’ या लोकांच्या चित्रपटाने अर्बन नक्षल असणाऱ्यांची झोप उडवली आहे. त्यांच्यामधील एक पिढी एक वर्षांनंतरही त्रस्त आहे. ते प्रेक्षकांना भुकणारी कुत्री असं म्हणत आहे त. मिस्टर अंधकार राज. मी भास्कर कसा मिळवू शकतो तो तर तुमच्याकडे आहे आणि कायम तुमचाच राहील.

११ मार्च २०२२ रोजी द काश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या विषयावर आधारित असून आता विवेक अग्निहोत्री द वॅक्सिन वॉर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहेत.

Exit mobile version