ब्रिटनमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहात आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर तसेच प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकर यांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी लिहिलेल्या ‘सनातन धर्म : सोर्स ऑफ ऑल सायन्सेस’ या पुस्तकाचेही खूप कौतुक इथे होत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत भारतीयांना आकृष्ट करण्यासाठी सगळे उमेदवार हिंदू धर्माबद्दल आस्था दाखवत आहेत. ब्रिटनमध्ये हिंदुत्वाबद्दल एक कुतुहल तिथल्या स्थानिक उमेदवारांत दिसून येते. अनेक उमेदवार हे या प्रचारादरम्यान मंदिरांना भेटी देत आहेत. त्याचदरम्यान विवानच्या या पुस्तकाची चर्चा होत आहे.
ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही आपण हिंदू असल्याचा अभिमान व्यक्त करतानाच भगवद्गीतेवर आपला विश्वास असल्याचे म्हटले होते तसेच गीतेतूनच आपण प्रेरणा घेत असल्याचेही नमूद केले होते. त्यामुळे तिथल्या विविध पक्षांकडूनही हिंदूधर्मियांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
निवडणुकीच्या प्रचाराला लागलेल्या वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी या पुस्तकाचे कौतुक केले असून विवानने एवढ्या कमी वयात हे पुस्तक लिहिले याबद्दलही त्याला शाबासकी मिळत आहे.
लेबर पार्टीचे उमेदवार केअर स्ट्रॅमर यांना लंडनमधील ज्येष्ठ पत्रकार हरिदत्त जोशी यांनी हे पुस्तक प्रदान केले. स्ट्रॅमर यांनीही या पुस्तकाचे कौतुक केले आणि विवानच्या प्रयत्नांबद्दल त्याची प्रशंसाही केली. स्ट्रॅमर हे ब्रिटनच्या राजकारणात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. ते पेशाने बॅरिस्टर आहेत. २०२०पासून ते लेबर पार्टीचे नेते आणि विरोधी पक्ष नेता म्हणूनही काम करत आहेत. सध्या ते ब्रिटिश संसदेचे सदस्यही आहेत. विशेष म्हणजे तेही १६व्या वर्षापासून लेबर पार्टीत काम करू लागले.
या पुस्तकाची दखल थेट लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील रॉयल फॅमिलीकडून घेण्यात आली होती. विवान याला त्याच्या कौतुकास्पद कामासाठी बॅज आणि नाणे देण्यात आले आहे.
हे ही वाचा:
बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ विश्वचषक घेऊन मायदेशी येण्यास सज्ज!
धर्मांतर होत राहिल्यास देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल
आदित्य ठाकरेंना का वाटतेय बहुमजली झोपड्यांची चिंता?
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करा
प्रशांत कारुळकर आणि कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकर याने लिहिलेल्या सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस या पुस्तकाला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून विवानला अनेक दिग्गजांकडून कौतुकाची थापही मिळाली आहे. विवानच्या या पुस्तकाला आता लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील रॉयल फॅमिलीकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. त्याला बॅज आणि नाणे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही नाणी अत्यंत दुर्मिळ आहेत. या नाण्यांमध्ये राणीचा मुकुट असून तो टॉवर ऑफ लंडनवर देखील दिसून येतो. अशी नाणी फक्त तीन बनवली गेली असून यातील तिसरे नाणे विवानला सादर करण्यात आले आहे.
भारतीय सेनादलाने विवानला धार्मिक साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल पदक देऊन गौरविले. अवघ्या १७व्या वर्षी विवानने हा सन्मान प्राप्त केला आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले.
‘नासा’तील शास्त्रज्ञ मोहम्मद सैदुल अहसान व मोहम्मद सैफ आलम यांनीही विवानच्या पुस्तकाचे कौतुक केले. त्यांना हे पुस्तक प्रदान करण्यात आले. विवानचे पुस्तक स्वीत्झर्लंडमध्येही पोहोचले. स्वीत्झर्लंडच्या संसदीय समितीचे प्रमुख डॉ. निक गुग्गर यांनी विवानच्या या लेखनाचे कौतुक केले.
देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनाही विवान याने त्याच्या पुस्तकाची प्रत प्रदान केली होती. त्यांच्याकडूनही त्याला शाबासकी मिळाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना राजभवन येथे या पुस्तकाची प्रत विवानने सहकुटुंब प्रदान केली तेव्हा राज्यपालांनी विवानच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आणि हाच नवा भारत असल्याची प्रतिक्रियाही दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विवानच्या पुस्तकाचे कौतुक केले.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांनीही विवानचे या पुस्तकाबद्दल तोंडभरून कौतुक केले.जैन धर्माचे आचार्य महाश्रमणजी यांनीही पुस्तक पाहून विवानला भरपूर आशीर्वाद दिले. भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, सुशील कुल्हारी, राजस्थानचे आयकर खात्याचे प्रिन्सिपल डायरेक्टर सुधांशू शेखर झा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण परदेशी, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जितो संघटनेचे प.पू. गुरुदेव नयपद्मसागरजी, कस्टम विभागाचे आयुक्त अस्लम हसन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खासगी सचिव एस. के. जाधव यांनीही विवानच्या या प्रयत्नाबद्दल त्याला शाबासकीची थाप दिली.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनीही या पुस्तकाचे खूप कौतुक केले आहे. तसेच प्रभू श्रीरामाच्या चरणांपाशी हे पुस्तक ठेवून भगवंतांचे आशीर्वादही घेतले आहेत. चंपतराय यांनी पुस्तकाबद्दल आपल्या भावना पहिल्या पानावर लिहिल्या असून त्यातून विवानच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.