भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ‘पोर्ट ऑफ स्पेन’मध्ये रंगला आहे. नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीच्या (नाबाद ८७) अर्धशतकांच्या जोरावर चार विकेट गमावून २८८ धावा केल्या. दिवसअखेरपर्यंत विराट कोहली आणि रवींद्र जडेजा मैदानात जम बसवून होते. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १०६ धावांची भागिदारी केली.
भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (८०), यशस्वी जयस्वाल (५७), शुभमन गिल (१०) आणि अजिंक्य रहाणे (८) बाद झाले.
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या सलामीविरांच्या जोडीने पुन्हा एकदा भारताला शानदार सुरुवात करून देत शतकी भागिदारी केली. या मालिकेमध्ये दुसऱ्यांदा त्यांनी १०० हून अधिक धावांची भागिदारी केली. डॉमिनिका कसोटीमध्ये दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी २२९ धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या कसोटीत त्यांनी १३९ धावा केल्या. दुपारच्या विश्रांतीपर्यंत भारताने एकही विकेट गमावली नव्हती. रोहित आणि यशस्वीने या भागिदारीसह सुनील गावस्कर-चेतन चौहान, वीरेंद्र सेहवाग-आकाश चोपडा आणि वीरेंद्र सेहवाग-वसीफ जाफर यांच्या विक्रमाची बरोबरी केली. या तीन जोड्यांनी विदेशात सलामीवीरांच्या भूमिकेत प्रत्येकी दोन शतकी भागिदाऱ्या केल्या आहेत.
दुसऱ्या सत्रात भारताची अडखळती सुरुवात झाली. भारताने एकेक करून चार विकेट गमावल्या. यशस्वी जयस्वाल ५७वर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला शुभमन गिल पुन्हा अपयशी ठरला. तर, रोहित शर्माही ८० धावा करून तंबूत परतला. भारतीय संघात पुनरागमन करणारा अजिंक्य रहाणे दुसऱ्यांदा आपल्या खेळ दाखवण्यात अपयशी ठरला. यशस्वीला होल्डरने बाद केले. तर, गिल याला किमार रोचने तंबूचा रस्ता दाखवला. तर, रोहित वारिकनच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
हे ही वाचा:
श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण
इर्शाळवाडीमध्ये बचावकार्याला सुरुवात; ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली
वेदनेवर उपचार महत्त्वाचा हीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यशैली
दोन प्रकारच्या सेक्स सीडी, बीभत्स आणि राजकीय
गेब्रियलचा चेंडू अजिंक्य रहाणे याच्या बॅटच्या कडेला लागून तोही त्रिफळाचीत झाला. ४३ धावांत चार विकेट गमावल्यानंतर विराट कोहली मैदानावर उतरला आणि त्याने १६१ चेंडूंमध्ये आठ चौकार लगावत ८७ धावा केल्या. तर, दुसरी बाजू जाडेजाने सांभाळली. खेळ संपला तेव्हा ८४ चेंडूंवर ३६ धावा करून जडेजा नाबाद होता. कोहली आणि जडेजाने पाचव्या विकेटसाठी १०६ धावांची भागिदारी केली.