बांगलादेशनंतर ब्रिटनमध्ये हिंसाचार; प्रवाशांसाठी सूचना जारी

बांगलादेशनंतर ब्रिटनमध्ये हिंसाचार; प्रवाशांसाठी सूचना जारी

United Kingdom and India flag together realtions textile cloth fabric texture

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेश सध्या पेटून उठलेला असताना ब्रिटनमध्येही हिंसाचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. साऊथ पोर्टमध्ये एका डान्स क्लासमध्ये झालेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, भारत सरकारने या घटनांची दखल घेत भारत सरकारने ब्रिटनला जाणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

ब्रिटनमध्ये साऊथ पोर्ट येथे झालेल्या चाकू हल्ल्यात तीन तरुणींचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर झालेल्या हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे. अलीकडेच लिवरपूल, ब्रिस्टल, लीड्स, हल, ब्लॅकपूल, स्टोक-ऑन-ट्रेंट, बेलफास्ट, नॉटिंघम आणि मॅन्चेस्टरमध्ये येथे दगडफेकीच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. अनेक ठिकाणी फटाक्यांद्वारे स्फोट घडवण्यात आले. देशात आलेले शरणार्थी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलच्या खिडक्या फोडण्यात आल्या आहेत. अनेक दुकानांवर हल्ले झाले आहेत. यात काही पोलिस आणि नागरिक जखमी झाले आहेत.

दरम्यान, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी प्रवासी सूचना जारी करताना म्हटलं आहे की, “भारतीय प्रवाशांना युनायटेड किंगडममधील काही भागात घडत असलेल्या हिंसक घटनांची माहिती असेल. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. परंतु, येथील सद्यस्थिती पाहता भारतातून यूकेला येणाऱ्या प्रवाशांना आम्ही सल्ला देत आहोत की त्यांनी यूकेला येताना, इथे राहत असताना सतर्क राहावं आणि सावधानता बाळगावी. स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं. ज्या-ज्या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत, हिंसाचार चालू आहे तिथे जाऊ नये.” त्यामुळे एकूणच बांगलादेश आणि युकेमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारअ अलर्ट मोडवर आले आहे.

हे ही वाचा:

विनेश फोगटची उपांत्य फेरीत धडक, दणदणीत सामना जिंकला !

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !

बांगलादेशमध्ये आंदोलकांनी तुरुंग पेटवताचं ५०० कैद्यांसह अनेक दहशतवादी पळाले

न्यूयॉर्कमध्ये आंदोलकांचा बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला

दुसरीकडे, बांगलादेशमध्ये अराजकता माजली असून शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला असून शेख यांनी बांगलादेशमधून पलायन करत भारतात आश्रय घेतला आहे. पुढे शेख हसीना या भारतमार्गे लंडनला जाणार असल्याचे बोलले जात आहे. बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंना लक्ष्य केले जात असून सातत्याने मंदिरांवरही हल्ले केले जात आहेत.

Exit mobile version