पाकिस्तानात गेल्या एक महिन्यापासून सुरू झालेलं हिंसेचं तांडव काही शांत होताना दिसत नाही. पाकिस्तानात आज पुन्हा हिंसा भडकली. पाकिस्तानातील तहरीक ए लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या इस्लामिक संघटनेने आज सहा पोलीस अधिकाऱ्यांचं अपहरण केलं. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या हिंसेत अनेक लोक दगावले आहेत.
तहरीक ए लब्बैक पाकिस्तान या संघटनेचा प्रमुख साद हुसैन याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ही हिंसा भडकलेली आहे. पैगंबर मोहम्मद यांचं कार्टुन प्रकाशित झालं होतं. त्यामुळे फ्रान्सच्या राजदूताला बरखास्त करण्याची मागणी या संघटनेने केली होती. त्यासाठी संघटनेने सरकारला २० एप्रिलची डेडलाईन दिली होती. त्यातच साद याला अटक करण्यात आल्याने त्याच्या समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. या हिंसाचारात आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानात हिंसा उसळल्यानंतर या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. लाहोरमधून ज्या सहा पोलीस अधिकाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. त्यात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी असून दोन अर्धसैनिक दलाचे अधिकारी आहेत, अशी माहिती लाहोर पोलिसांचे प्रवक्ते आरिफ राणा यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
जॉर्ज फ्लॉईड मृत्यूप्रकरणात अमेरिकन न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल
ठाकरे सरकारने सूडाच्या राजकारणाचा कळस गाठला आहे
राज्यात आणीबाणी लावा- काँग्रेस आमदाराचेच मोदींना पत्र
श्रीरामनवमी निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा
दरम्यान, टीएलपीचे प्रवक्ते शाफिर अमीनी यांनी पोलिसांनी आज आमच्या चार समर्थकांना मारलं असून अनेकजण जखमी झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांनी या संघटनेवर बंदी घातल्या गेल्यापासून या संघटनेचं वृत्त देणं बंद केलं आहे. तसेच आजपासून मोबाईल आणि इंटरनेट सेवाही ठप्प करण्यात आल्या आहेत. लाहोरच्या चौक यतीमकाहनमध्ये संघटनेच्या मुख्यालयापर्यंत जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.