युक्रेनमधील धरण कोसळल्यानंतर ग्रामस्थांचे पलायन

युद्धग्रस्त युक्रेनमधील धरण फुटल्याने पूरसदृश्य स्थिती

युक्रेनमधील धरण कोसळल्यानंतर ग्रामस्थांचे पलायन

युद्धग्रस्त युक्रेनमधील एक धरण फुटल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी पलायन केले आहे. हे धरण रशियानेच उडवले, असा आरोप युक्रेनने केला आहे. तर, एका लष्करी मोहिमेवरून लक्ष विचलित करण्यासाठी युक्रेननेच हे घडवून आणल्याचा आरोप रशियाने केला आहे. त्याचवेळी युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लायमेन्को यांनीही रशियाने केलेल्या गोळीबारात दोन पोलिस जखमी झाल्याचा आरोप केला आहे.

मंगळवारी दक्षिण युक्रेनमधील रशियन आणि युक्रेनियन सैन्याला वेगळे करणार्‍या डनिप्रो नदीवरील नोव्हा काखोव्का हे मोठे धरण फुटल्याने युक्रेनमधील युद्धक्षेत्राच्या काही भागांत पूर आला. त्यामुळे गावकऱ्यांना पळून जाण्यास भाग पाडले. हे धरण रशियाने उडवल्याचा आरोप युक्रेनने केला. तर, एका लष्करी मोहिमेपासून रशियाचे लक्ष विचलित करण्यासाठी युक्रेननेच हे मुद्दाम घडवले, असा आरोप रशियाने केला आहे. तर, काही रशियनांच्या म्हणण्यानुसार, हे धरण स्वत:च कोसळले आहे. युक्रेन आणि रशियाने एकमेकांवर आरोप केले असले तरी त्यासंदर्भातील पुरावा कोणी सादर करू शकलेले नाही. जीनिव्हा करारानुसार, युद्धात धरणांना लक्ष्य करण्यावर बंदी आहे.

धरण फुटल्यानंतर धरणाखालील खेरसन शहरातील डनिप्रोच्या उपनदीवरील घाट पाण्याखाली गेला होता. त्यामुळे अनेकांनी गावातील घर सोडून शहराबाहेर धाव घेतली. युक्रेन सरकारने प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडिओत पाणी जसजसे वाढत आहे, तसतसे पोलिस वृद्धांना आणि गावातील कुत्र्यांना वाचवत असल्याचे दृश्य दिसत आहे.

नोव्हा काखोव्काच्या रशियाने स्थापित केलेल्या महौपारांनी सांगितले की, पाण्याची पातळी ११ मीटर (३६ फूट)पर्यंत वाढली आहे. हा भाग रशियाने गिळंकृत करूनही काही नागरिकांनी येथेच राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तेथील हलिब नावाच्या व्यक्तीने आम्हाला अद्याप तरी दुकानात जाण्याची परवानगी आहे. मात्र पुढे काय आदेश दिले जातील, माहीत नाही, अशी हतबलता व्यक्त केली. तर, तुम्ही कुठे जाण्याचा प्रयत्न केला तर ते परवानगी देत नाहीत. ते लगेच त्यांच्या मशीनगन तुमच्याकडे रोखतात. दर तासाला अधिकाधिक पाणी येत आहे. ते खूप घाणेरडे आहे, असे एका महिलेने सांगितले. रशियन-नियंत्रित नदीकाठावरील काझकोवा डिब्रोवा प्राणीसंग्रहालय पाण्याखाली गेले असून येथील सर्व ३०० प्राणी मरण पावल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाच्या फेसबुक खात्याद्वारे सांगण्यात आली.

हे ही वाचा:

दक्षिण आफ्रिकेतील विशेष कार्यक्रमात ‘आयएनएस त्रिशूल’ सहभागी होणार

वसतीगृहात तरुणीचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

मृतदेहांतून हात बाहेर आला आणि बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पाय पकडला!

अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रात मोदी दुसऱ्यांदा संबोधित करणार

डनिप्रोच्या रशियन-नियंत्रित किनारपट्टीवरील ओलेश्की हे छोटे शहरही पाण्याखाली गेले आहे. या धरणातून रशियन-व्याप्त क्रिमियन द्वीपकल्पासह दक्षिण युक्रेनियन शेतजमिनीच्या विस्तृत क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. तसेच अणु प्रकल्प थंड करण्यासाठीही याचा वापर केला जातो. हे धरण २४० किमी लांब आणि २३ किमी रुंद आहे.

Exit mobile version