निवृत्तीचे संकेत?? विक्रम गोखले म्हणतात, आता थांबायला हवे!

निवृत्तीचे संकेत?? विक्रम गोखले म्हणतात, आता थांबायला हवे!

नेहमी आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे अभिनेते विक्रम गोखले यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्रास करून घेण्याचे आता वय नाही, आता थांबायला हवे असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील निवृत्तीचे सूतोवाच केले आहे. ते म्हणाले, ” त्रास करून घेण्याचे माझे वय नाही मी आता हळू हळू काम करत आहे. पण आता कुठेतरी थांबायला हवे.” असे बोलून त्यांनी त्यांच्या निवृत्तीबद्दल सांगितले आहे. मात्र, पुढे आपण तरुण पिढीला मागर्दर्शन करत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लोककला सादर करताना त्याच्यावर खूप मेहनत करावी लागते. नृत्य, विनोद आणि गायन करतानाही यावर मेहनत घ्यावी लागते, आणि या सगळ्याचा कधी कधी त्रास होतो, असे ते म्हणतात.

हे ही वाचा:

परमबीर सिंह वसुली प्रकरणात सॉफ्टवेअरमध्ये ‘छोटा शकील’

पुन्हा एकदा लघुग्रह पृथ्वीकडे झेपावला!

अर्थसंकल्पाविषयीचा हा इतिहास माहित आहे का? येथे वाचा सविस्तर

मुंबईमध्ये फक्त भाजपच बदल घडवून आणेल

ते असेही म्हणाले की, प्रेक्षकांनी मालिका बघताना, त्या निवडताना स्वताःचा निवड तपासून पाहणे गरजेचे आहे. मालिकांमधून काही वैचारिक मिळत नसेल तर त्या पाहणे बंद करावे, असे रोकठोक मत अभिनेते विक्रम गोखले यांनी मांडले आहे.

कल्याणमध्ये सुभेदार वाद कट्टा आयोजित प्राध्यापक रामभाऊ कापसे व्याख्यानमालेतील वक्ते म्हणून बोलताना गोखले यांनी मनोरंजन सृष्टीचा दर्जा यावर आपले स्पष्ट मत मांडले आहे. तसेच, प्रेक्षकांनी अशा मालिका बघून मौल्यवान वेळ वाया न घालवण्याची विनंती केली आहे.

प्रेक्षकांनी स्वतः च्या निवडीबद्दल काही बंधने स्वतःवर घातली पाहिजेत. ” प्रेक्षकांना माझी विनंती आहे की, आधी तुमचा जो चॉईस आहे त्यावर बंधन घाला, तो तपासून पाहा. आपण काय पाहतोय? यामध्ये काही बुद्धीवर्धक आहे का ? नसेल तर मग तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवू नका. आपण कुठल्या प्रकारच्या मालिका बघतोय, टीव्हीवर काय बघतोय, त्यात काही तथ्य आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version