अमेरिकन सैन्याने १९७५ साली व्हिएतनाममधील युद्ध हरल्यानंतर तिथून पळ काढला होता. व्हिएतनामची राजधानी असलेल्या सायगॉनमधून अमेरिकेने पळत काढतानाची दृश्य ही आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत. आज २०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातल्या काबुलमधूनही अशाच पद्धतीने पळ काढला आहे.
२००१ सालापासून अमेरिका अफगाणिस्तानमध्ये तळ टाकून बसलेला आहे. ११ सप्टेंबर २००१ असली अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या ट्विन टॉवर्सवर हल्ला करण्यात आला तेव्हापासूनच अमेरीकेने अफगाणिस्तान विरुद्ध युद्ध पुकारलं होतं. अवघ्या काही महिन्यात अमेरिकेने तालिबानचा पाडाव केला होता, परंतु त्यानंतर तालिबान मध्ये सरकार प्रस्थापित करून तिथे सुशासन सुरु व्हावं याकरता अमेरिकन सैन्य तालिबानमध्ये तळ ठोकून बसलं होतं.
अमेरिकन सैन्य गेलं तर तालिबान पुन्हा सत्तेवर येईल याची शाश्वती सर्व जगाला होती. परंतु तसं असतानाही अमेरिकेने अफगाणिस्तान मधून काढता पाय घेतला आणि अवघ्या काही महिन्यातच तालिबानने अफगाणिस्तान वर कब्जा केला.
हे ही वाचा:
तालिबानवर विश्वास ठेवता येणार नाही
रौप्य पदक जिंकूनही मोदींची रवी दहियाकडे तक्रार का?
ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र
स्वरा भास्करच्या अजब तर्कावर अरेस्ट स्वरा वायरल
तालिबानने केलेला हा कब्जा, याकरता अमेरिकेची असलेली जबाबदारी आणि त्याचबरोबर अमेरिकेचा अशा पद्धतीने मित्र राष्ट्रांना ऐनवेळी सोडून जाण्याचा इतिहास या विषयावर भाष्य करणारा आमचा व्हिडिओ नक्की पहा.