उपराष्ट्रपती धनखड इराणला रवाना, काय कारण?

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली माहिती

उपराष्ट्रपती धनखड इराणला रवाना, काय कारण?

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे भारताचे प्रतिनिधी म्हणून इराणला रवाना झाले आहेत.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली.भारताच्या वतीने शोक सभेत सहभागी होण्यासाठी उपराष्ट्रपती बुधवारी (२२ मे) इराणला रवाना झाले आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटमध्ये म्हटले.दरम्यान, रईसी यांच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतात मंगळवारी (२१ मे) एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला होता.

रविवारी (१९ मे) खराब हवामानामुळं इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. त्यानंतर या अपघातात हेलिकॉप्टरमधील इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.भारत आणि इराणचे चांगले संबंध आहेत.नुकताच दोन्ही देशांनी चाबहार करारावर स्वाक्षरी केली होती.राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूवर पंतप्रधान मोदींनी ट्विट शोक व्यक्त केलं होत.

हे ही वाचा:

अपघातानंतर पुणे महानगरपालिकेला आली जाग; अनधिकृत पबवर हातोडा!

न्यायालय परिसरात विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न

आगरतळा रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी नागरिकांना अटक!

‘प्रभू रामांच्या हाती १३ किलो चांदीचे धनुष्यबाण’

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यावर अंत्यसंस्कार २३ मे रोजी होणार असून भारताकडून उपराष्ट्रपती धनखड इराणला रवाना झाले आहेत.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट करत म्हटले की, इराणच्या दुर्घटनेत मृत्यू पावलेले राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी अन अधिकारी यांच्या अंत्यसंस्कारासाठी भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड उपस्थित राहणार असून ते आज दिल्लीहून इराणला रवाना झाले आहेत.

इराणचे उपाध्यक्ष मोहसेन मन्सौरी यांनी सांगितले की, तबरीझ शहरात अंत्ययात्रेनंतर राष्ट्रपतींचे पार्थिव तेहरान येथे आणण्यात आले.राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा जन्म इराणच्या मशहद शहरात झाला होता.त्यांना २३ मे रोजी याच शहरात दफन केले जाणार आहे.

Exit mobile version