गोड वाणी झाली निशब्द… गायिका वाणी जयराम यांचे निधन

शनिवारी सकाळी त्या चेन्नईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या.

गोड वाणी झाली निशब्द… गायिका वाणी जयराम यांचे निधन

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पद्मभूषण पुरस्काराने सन्मान मिळालेल्या दक्षिणेतील प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन (७७) झाले आहे. त्यांच्या डोक्याला खूप आधी दुखापत झाली होती, त्यामुळे त्या आजारी असायच्या. शनिवारी सकाळी त्या चेन्नईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलीस त्यांच्या मृत्यूमागचे कारण शोधत आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.

शनिवारी सकाळी वाणी जयराम यांची मोलकरीण कामासाठीघरी पोहोचली तेव्हा बेल वाजवूनही दरवाजा उघडला नाही. त्यांनी हाक मारली असता त्यावरही प्रतिसाद न मिळाल्याने मोलकरणीने जयराम यांच्या लहान बहिणीशी संपर्क साधला. त्यांनी डुप्लिकेट चावीने घर उघडले. तेव्हा वाणी बेडरूममध्ये जमिनीवर पडल्याचे आढळून आले. तिच्या कपाळावर जखमेच्या खुणा होत्या, पडून कपाळाला दुखापत दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. . मात्र, तपासानंतरच सत्य सिद्ध होईल. सध्या याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाणी जयराम  दक्षिणेतील प्रसिद्ध पार्श्वगायिका होत्या.  १९४५ मध्ये तामिळनाडूतील वेल्लोर येथे जन्मलेल्या वाणी यांचे खरे नाव कलैवानी होते. वाणी जयराम या एका काळातील अत्यंत लोकप्रिय आणि उत्कृष्ट गायिका होत्या. स्वप्नम या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. हिंदी, मराठी, भोजपुरी, उर्दू या भाषांव्यतिरिक्त तमिळ, तेलगू, मल्याळम, मराठी, बंगाली, तुलू आणि ओडिया या भाषांमध्ये गाणी त्यांनी गाणी गायली.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी एमएस इलैयाराजा, आरडी बर्मन, केव्ही महादेवन, ओपी नय्यर आणि मदन मोहन यासारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम केले. नुकतीच त्याने आपल्या कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण केली होती. आरडी बर्मन यांच्यासोबतही त्यांनी अनेक गाणी गायली. त्या इतक्या सुंदर आणि सुमधुर गायच्या की त्यांना आजच्या भारताची मीराही म्हटले जाते. अशा परिस्थितीत त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा:

पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त

मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…

अजितदादांच्या मते उद्धव ठाकरेंमुळे सरकार कोसळलं?

सॅमसंगचे आता भारतातच ‘स्मार्ट’ उत्पादन

१० हजारांपेक्षा जास्त गाणी गायली

जयराम यांनी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत १० हजाराहून अधिक गाणी गायली आहेत ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. त्यांच्या सुरेल आवाजामुळे त्यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. तर त्याच वेळी प्रादेशिक भाषांमधील उत्कृष्ट गाण्यांमुळे त्यांना राज्याचा पुरस्कारही मिळाला.

मेरे तो गिरधर गोपालसाठी फिल्मफेअर

वाणी जयराम यांनी बॉलिवूडला अनेक उत्तम गाणी दिली. १९८० मध्ये मीरा चित्रपटातील मेरे तो गिरधर गोपाल या गाण्यासाठी वाणी यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुड्डी चित्रपटातील त्यांनी गायलेले बोले रे पपीहारा… हे गाणेही खूप गाजले. याशिवाय त्यांना १९९१ साली संगीतपीठ सन्मान देखील मिळाला होता, वाणी हा सन्मान मिळवणारी सर्वात तरुण गायिका होती. तेव्हा त्यांचे वय ४६ वर्षे होते.

Exit mobile version