व्हेनेझुएला लसीच्या बदल्यात देणार तेल

व्हेनेझुएला लसीच्या बदल्यात देणार तेल

आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या व्हेनेझुएलाने लसींच्या बदल्यात तेल देण्याची तयारी दर्शवली आहे. व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादलेले असल्याने सध्या त्यांच्याकडून तेल खरेदी केली जाऊ शकत नाही. त्यातच व्हेनेझुएलामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने अखेरीस लसींच्या बदल्यात तेल देण्याची तयारी व्हेनेझुएलाने दाखवली आहे.

व्हेनेझुएलामध्ये तेलाचे टँकर आहेत. आमच्याकडे तेलाचे खरेदीदार आहेत. आम्ही आम्हाला आवश्यक असलेल्या लसींसाठी तेल द्यायला तयार आहोत. लसींच्या बदल्यात तेल! व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलास मादुरो म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

संजय राऊतांवर ट्वीट करून शरद पवारांना आवाहन करण्याची वेळ

मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मालवणीत झाली रंगांची उधळण

इस्रोकडून हरित इंधन निर्मीतीचे प्रयत्न वेगात सुरू

व्हेनेझुएला प्रशासनाने आत्तापर्यंत केवळ रशियाच्या स्पुतनिक ५ लसीला आणि सिनोफार्म या चीनी कंपनीने बनवलेल्या लसीला मान्यता दिली आहे.

दिनांक १५ मार्च रोजी व्हेनेझुएलाने पॅन अमेरिकन हेल्श ऑर्गनायझेशनला (पीएएचओ)दिलेल्या माहितीनुसार ते आता ऍस्ट्राझेनेकाच्या लसीला देखील मान्यता देणार आहेत. त्यांनी कोवॅक्स मार्फत १.४ ते २.४ मिलियन डोसेसची मागणी केली होती. त्यांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमात सर्वांना लसीची समान संधी मिळेल हे पाहण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडे व्हेनेझुएलाचे प्रचंड कर्ज शिल्लक असल्याने यापैकी एकही लस अजूनपर्यंत त्यांना देण्यात आलेली नाही.

व्हेनेझुएलाने फेब्रुवारी महिन्यात लसीकरण मोहिमेला प्रारंभ केला होता. मात्र त्याचे आकडे गुलदस्त्यात आहेत.

अधिकृत आकडेवारीनुसार व्हेनेझुएलात सध्या १५०,००० रुग्ण असून सुमारे १,५०० मृत्यु झाले आहेत. या आकडेवारीवर अनेक समाजिक संस्थांनी आक्षेप घेतला आहे.

प्रशासनाला आता दुसऱ्या लाटेबद्दल चिंता वाटत असून, ब्राझिलच्या वेगाने पसरणाऱ्या आवृत्तीबद्दल अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version