राज्य सरकारच्या पुढाकाराने ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’

स्वातंत्र्यवीरांच्या जन्मगावी नाशिकमध्ये थिम पार्क आणि संग्रहालय सुद्धा उभारणार

राज्य सरकारच्या पुढाकाराने ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना नुकतीच भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. आता नाशिकमधील आपल्या देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ थिम पार्क स्वा. सावरकर यांच्या जन्मस्थानी सुरु होणार आहे.  स्वातंत्र्यवीरांचे विचार आणि जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्यातील हे पहिले वीर सावरकर पर्यटन सर्किट निर्माण करण्यात येणार आहे.   तसेच, त्यांचे जन्मस्थान असलेल्या नाशिकमधील भगूर इथे भव्य सावरकर थिम पार्क आणि संग्रहालयसुद्धा उभारण्यात येणार आहे. आजसुद्धा भगूर हे गाव सावरकर यांच्या नावाने ओळखले जाते. तिकडेच त्यांचा जन्म झाला होता. भगूर मध्ये असलेल्या सावरकर वाडा इथे आयोजित कार्यक्रमास राज्याचे पर्यटन मंत्री  मंगलप्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त उद्या २६ फेब्रुवारी रोजी सकाळी भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी
भव्य अभिवादन पदयात्रा निघणार आहे. याच पदयात्रेत अष्टभुजा देवीची पालखी सुद्धा निघणार आहे. सकाळी सावरकर वाडा इथल्या मुख्य कार्यक्रमात गायन, वादन आणि योगेश सोमण लिखित आणि दिग्दर्शित ‘सावरकर आणि मृत्यू’ या संवादाचे अभिवाचन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. भगूर मधील या कार्यक्रमात पर्यटन विभागाच्या माध्यमातून देशातल्या पहिल्या ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ची घोषणाही करण्यात येणार आहे. शिवाय भगूर येथे बनणाऱ्या  स्वा. सावरकरांच्या विचार दर्शनावर आधारित भव्य असे थिम पार्क आणि संग्रहालय याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात

कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर

या संपूर्ण प्रकल्पाबाबत पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थिताना संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे राष्ट्रासाठी महान त्याग आणि समर्पण याचे मूर्तिमंत रूपच. या कार्यक्रमाच्या रूपाने त्यांच्या महान त्यागाला आणि समर्पणाला मानवंदना देण्याचे निमित्त. त्यांचे कार्य इतके महान आहे. त्यामुळेच भव्य पदयात्रा सुद्धा आयोजित केली आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि अन्य सहयोगी संस्था संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहेत.
२८ मे, १८८३ रोजी  स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म भगूर मधल्या याच सावरकर वाड्यात झाला होता. बालपणापासूनच ते राष्ट्रभक्ती    प्रेरित झाल्यामुळे याच वाड्यातील अष्टभुजा देवीच्या समोर त्यांनी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून ‘ मारिता मारिता मरेतो झुंजेंन’ अशी त्यांनी शपथ घेतली होती.  पुढे सावरकरांचे सामाजिक सुधारणेचे कार्य , क्रांतिकार्य, राष्ट्राच्या हितासाठी  महान त्याग, साहित्यातील योगदान , स्वातंत्र्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टा आपल्याला माहित आहेतच. अनेक तरुणांचे ते आज प्रेरणा स्थान आहेत.   २६ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीरांचा हा कार्यक्रम महाराष्ट्र पर्यटन विभागाने विशेष पुढाकार घेऊन त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. याच मोहिमेतून हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीरांच्या जन्मगावी होत आहे.

Exit mobile version