वेदांत समुहाकडून प्राणवायूसाठी दक्षिणेतील काही भागांत मदत

वेदांत समुहाचा तुतिकोरीन येथील तांब शुद्धीकरण प्रकल्प स्थानिकांनी आरोग्याला हानिकारक म्हणून बंद करायला लावला होता. तोच प्रकल्प आता स्थानिकांना प्राणवायू पुरवण्यासाठी मदतीला उभा राहिला आहे.

वेदांत समुहाकडून प्राणवायूसाठी दक्षिणेतील काही भागांत मदत

वेदांत समुहाने केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री इ पलानीस्वामी यांना पत्र लिहून दक्षिणेतील राज्यांना त्यांच्या थुतुकोडी (तुतिकोरीन) येथील तांब्याच्या प्रकल्पातून प्राणवायूचा पुरवठा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे २०१८ मध्ये हाच प्रकल्प स्थानिकांनी अत्यंत हिंसक आंदोलन करून आरोग्याला हानिकारक ठरत असल्याचे कारण देऊन बंद पाडला होता, तोच आता स्थानिकांना प्राणवायू मिळावा यासाठी मदत द्यायला तयार आहे.

या प्रकल्पात दोन प्राणवायू निर्मितीचे कारखाने आहेत. दोघांची एकत्रित क्षमता दिवसाला १०५० टन प्राणवायू निर्माण करण्याची आहे. वास्तविक कारखान्याने सर्वोच्च न्यायलयात या कारखान्यातून द्रवरुप ऑक्सिजन पुरवता यावा यासाठी मदत देण्यास तयार असल्याची याचिका दाखल केली आहे.

हे ही वाचा:

रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला सर्वाधिक कोटा, पण ठाकरे सरकारचे रडगाणे सुरूच!

लस निर्यातीवरून प्रियांकांचे किळसवाणे राजकारण

मोदी सरकारवर टीका ही तर मजबूरी

सेन्सेक्समध्ये आज उसळी

त्या पत्रात वेदांत समुहाने दिलेल्या माहितीनुसार, हा ऑक्सिजन निर्मितीचा भाग चालू करण्यासाठी त्यांचा कर्मचारी वर्ग देखील निघाला आहे. त्यानंतर मंत्रालयाच्या आदेशानुसार आजूबाजूच्या परिसरातील ज्या भागांना तातडीची निकड असेल अशा भागांत प्राणवायूचा पुरवठा करतील.

स्टर्लाईट कॉपरचे सीईओ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, देशाला या काळात या जीवनावश्यक वस्तुंची कमतरता भासू नये यासाठी आम्हाला आमच्याकडील या सुविधा तुमच्या वापराकरता उपलब्ध करून द्यायला आवडतील.

हाच तांब शुद्धीकरण प्रकल्प इथल्याच स्थानिकांनी मे २०१८ मध्ये आरोग्याला हानिकारक असल्याचे कारण देत हिंसक आंदोलनं करून बंद केला होता. हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तांब शुद्धीकरण कारखाना होता.

Exit mobile version