बांग्लादेशमधील झेनाईदह येथील एका हिंदू मंदिरातील मूर्तींची काही हल्लेखोरांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तींनी मंदिरात तोडफोड केली आहे. देवीच्या मूर्तीची विटंबना देखील करण्यात आली आहे. पोलीस या व्यक्तींचा शोध घेत आहेत.
बांग्लादेशातील झेनाइदह जिल्ह्यातील दौतिया गावातील कालीमाता मंदिरात तोडफोड केली आहे. मंदिराच्या अधिकाऱ्यांना मंदिरात मूर्तीचे काही तुकडे दिसले आणि मंदिरापासून काही अंतरावर मूर्तीचा काही भाग आढळून आला. मंदिर समितीचे अध्यक्ष सुकुमार कुंदा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
कालीमाता मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी नियमित पूजा होत असते, अशी माहितीही सुकुमार कुंदा यांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला असून, मूर्तीची तोडफोड करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
बांग्लादेशमध्ये दहा दिवसीय नवरात्रोत्सव संपला त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी नदी घाटांवर देवीच्या मूर्तींचे विसर्जनही झाले. यानंतर ही घटना समोर आली आहे.
हे ही वाचा:
आयसिजी आणि एटीएसची गुजरातमध्ये मोठी कारवाई, ६ जण अटक
नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ‘इतकी’ मदत जाहीर
या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली
मागील वर्षी नवरात्रोत्सव काळत बांग्लादेशमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. तसेच याचवर्षी १७ मार्च रोजी बांग्लादेशमध्ये इस्कॉन मंदिरात तोडफोड झाल्याची घटना घडलेली होती.