कौतुकास्पद! लसीकरण १ अब्जच्या दिशेने

कौतुकास्पद! लसीकरण १ अब्जच्या दिशेने

येत्या काहीच दिवसात भारत एका आनंदाच्या क्षणांचे साक्षीदार होणार आहे. अभूतपूर्व असा हा क्षण म्हणजे लसीकरण आता १०० कोटींचा आकडा लवकरच पार पडणार आहे. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये मूळातच लसीकरण प्रक्रिया राबविणे हे एक मोठे आव्हान होते. लसीकरणाची सुरुवात करून १० महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतामध्ये १०० कोटींचा लसीकरणाचा आकडा पार होणार आहे ही बाब अभिमानास्पद आहे.

सुरुवातीच्या काळात १०० कोटींचा टप्पा गाठणे ही गोष्ट साधी सोपी नक्कीच नाही. विशिष्ट तापमानात लसींची वाहतूक, वितरण आणि साठवण या देशात शीत-साखळीच्या विस्तृत नेटवर्क नसलेल्या देशात प्रचंड अतिरिक्त अडथळे निर्माण केले. कोरोना काळात तीन महिन्यांहून अधिक काळ, भारत अतिशय वाईट टप्प्यातूनही सावरलेला आहे.

सुमारे २७५ दिवसांत १०० कोटींचा टप्पा गाठला जात आहे ही बाब खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. लस देण्यास सुरुवात ही १६ जानेवारी पासून झाली. या दहा महिन्यांच्या कालावधीत दररोज सरासरी २७ लाख डोस दिले गेले आहेत. जानेवारीच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये काही दिवसांमध्ये ५० हजारपेक्षा कमी डोस दिले गेले होते. आतापर्यंत २८.१८ कोटीहून अधिक नागरिकांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे.

 

हे ही वाचा:

बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले सुरूच, ६० घरं जाळली

पुँछमधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी कमांडो

भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार!

डेरा सच्चा सौदाच्या गुरमित रामराहीमचा जन्म जाणार तुरुंगात

 

याचा अर्थ असा की, भारतातील एकूण लोकसंख्येच्या ७४% किंवा जवळजवळ तीन-चतुर्थांश लोकांना किमान एक डोस मिळाला आहे. तर ३०% लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. लहान लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये कोविड -१९ लसीकरणाचे प्रमाण हे उल्लेखनीय आहे. सिक्कीम, हिमाचल प्रदेश, गोवा आणि जम्मू -काश्मीर, लडाख, चंदीगड आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीला आधीच लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. दोन्ही डोस घेतलेले आरोग्य सेवक ८७ ,८३,६६५ इतके आहेत. तर लक्षद्वीप, सिक्कीम आणि लडाखच्या बाबतीत प्रत्येकी ४०% पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. महानगरांसह बहुतेक मोठ्या शहरी केंद्रांमध्ये लसीकरणाचा टक्का चांगलाच नोंदवला गेला आहे. बहुतेक मोठ्या शहरांमध्ये अनेकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.

Exit mobile version