अफगाणिस्तानात तालिबानची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर अफगाणिस्तानाच अराजकाची अवस्था निर्माण झाली आहे. त्यातून जीव वाचवण्यासाठी अनेक नागरीकांनी अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करायला सुरूवात केली आहे. या प्रयत्नात कित्येक नागरीकांनी प्राण देखील गमावले आहेत. उझबेकिस्तानने अफगाणिस्तानच्या काही विमानांना जबरदस्ती उतरण्यासा भाग पाडले आहे.
मागच्या दोन दिवसात उझबेकिस्तान एअर फोर्सने अफगाणिस्तानच्या ४६ विमानांना जबरदस्ती लँडिंग करण्यास भाग पाडले आहे. या विमानांमध्ये ५८५ सशस्त्र सैनिक होते. बेकायदेशीररित्या उझबेकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या विमानांना उझबेकिस्तानच्या विमानतळांवर उतरवण्यात आले.
हे ही वाचा:
आमदार देवेंद्र भुयार यांना कारावासाची शिक्षा!
ते दुःख विसरून अमितने घेतला सुवर्णपदकाचा वेध
तालिबानकडून महिलांना ‘अभय’ दिल्याची घोषणा
अफगाणिस्तानात रविवारी सरकार कोसळले. तालिबानी दहशतवाद्यांनी राजधानी काबुलवर नियंत्रण मिळवलं. तेव्हापासूनच अफगाणि नागरिक आणि सैनिक देश सोडून जात आहेत. रविवारी अफगाणिस्तानच्या लष्करी जेट विमानाने उझबेकिस्तानच्या हवाई हद्दीत बेकायदेशिररित्या प्रवेश केल्यानंतर ते विमान पाडण्यात आलं. उझबेकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली आहे.
“उझबेकिस्तानच्या हवाई सुरक्षा पथकाने अफगाणिस्तानच्या लष्करी विमानांचा बेकायदरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न हाणून पाडला” असे रॉयटर्सने संरक्षण दलाचे प्रवक्ते बाहरोम झुलफीकोरोव्ह यांच्या हवाल्याने म्हटले आहे. सीमा ओलांडून आलेल्या ८४ अफगाणि सैनिकांना ताब्यात घेतल्याचं उझबेकिस्तानने रविवारी सांगितले आहे. तालिबानच्या अफगाणिस्तानावरील ताब्यामुळे या प्रदेशात अशांतता निर्माण झाली आहे.