उत्तराखंड येथे महापूर येऊन गेल्यानंतर सुरू करण्यात आलेले शोधकार्य व बचावकार्य अजूनही चालू आहे. दिवसेंदिवस दुर्दैवान मृतांची संख्या हळूहळू वाढत आहे. तपोवन बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठीचे बचावकार्य सलग १५व्या दिवशीही चालू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची एकूण संख्या आता ६७ वर पोहोचली आहे.
हे ही वाचा:
याबाबत चमोली पोलिसांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
— chamoli police (@chamolipolice) February 21, 2021
ऋषिगंगा नदीत हिमकडा कोसळल्यानंतर आलेल्या महापूरामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी अडकलेल्या कामगारांचे बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले होते. हे कार्य अजूनही युद्धपातळीवर चालू आहे.
या प्रलयात १३.२ मेगावॅट क्षमतेचा ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्प पुर्णपणे उध्वस्त झाला तर तपोवन-विष्णुगड प्रकल्पाचे प्रचंड नुकसान झाले. अजून पाच मृतदेह मिळाल्याने मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या ६७ झाली. या प्रलयामुळे १३७ लोक अजूनही बेपत्ता आहेत.
एसडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या १२ तुकड्या रेनी गावापासून ते श्रीनगरपर्यंत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहेत. याभागातील संदेशवहन सुलभ व्हावे यासाठी कार्यरत आहेत.
मोठ्या प्रमाणात गाळ आणि इतर मलबा तपोवन येथील बोगद्यात अडकल्याने बचावकार्य दीर्घकाळ चालणार आहे, असेही एसडीआरएफने सांगितले आहे. रेनी गावाला कोणत्याही आपत्तीपासून वाचवण्यासाठी सुचना प्रणाली बसविण्यात आली आहे.