‘अरुणाचल प्रदेश संघर्षात भारताने परिस्थिती व्यवस्थित हाताळली’

अमेरिकेने भारताची केली पाठराखण

‘अरुणाचल प्रदेश संघर्षात भारताने परिस्थिती व्यवस्थित हाताळली’

अरुणाचल प्रदेश येथील तवांगमध्ये चिनी सैनिकांनी आगळीक करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडल्यानंतर भारताने ही परिस्थिती व्यवस्थित हाताळली असे कौतुकोद्गार अमेरिकेने काढले आहेत.

पेंटागॉनचे प्रसारमाध्यम सचिव पॅट रायडर यांनी पत्रक जारी करत भारताची स्तुती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही आमच्या सहकाऱ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात नेहमीच आग्रही राहू. भारताने या स्थितीत ज्या पद्धतीने प्रश्न हाताळला आहे ते पाहता आमचे त्यांना समर्थन आहे. अमेरिकेने सांगितले की, भारत आणि चीन यांच्यात सीमावर्ती भागात सुरू असलेल्या हालचालींवर आमची नजर आहे. चीन कोणत्याही थराला जात सीमेवर सैन्याला एकत्र आणत आहे आणि संघर्षजन्य परिस्थिती निर्माण करत आहे. स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीन अमेरिकेच्या सहकारी देशांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहे.

हे ही वाचा:

१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!

पुणे बंदमुळे व्यावसायिकांना बसला मोठा फटका; ३३ कोटींची बसली झळ

लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्याला मरेपर्यंत तुरुंगवास

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वाचे निर्णय झाले

 

व्हाइट हाऊसचे प्रसारमाध्यम सचिव जीन पिअरे यांनी म्हटले की, अमेरिकेचे या सगळ्या घडामोडींवर बारीक लक्ष आहे. दोन्ही पक्ष हे संघर्षाच्या स्थितीतून बाहेर येतील अशी आम्हाला आशा आहे. दोन्ही बाजूंनी चर्चेच्या मार्गाने प्रयत्न व्हावेत अशी आम्हाला अपेक्षा आहे.

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात ९ डिसेंबरला भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष उफाळला होता. भारतीय सैन्याने त्यांना तिथून मागे जाण्यास सांगितले पण त्यांनी ऐकले नाही. त्यातून मग दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये संघर्ष पेटला. त्यात दोन्हीकडील सैनिकांना इजा झाली. चिनी सैनिकांनी केलेल्या या आगळीकीला भारताने चोख उत्तर दिले. यासंदर्भातील एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. अर्थात तो त्याच प्रसंगाचा आहे अथवा नाही याची पुष्टी झालेली नाही. मागे गलवान खोऱ्यातही अशीच झटापट झाली होती.

Exit mobile version