अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे असलेले भारतीय वंशाचे विवेक रामस्वामी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते बनले आहेत. रामास्वामी यांनी मोदींचे कौतुक करत इंडो- पॅसिफिक क्षेत्रात चीनला रोखण्याच्या भारताच्या भूमिकेचे देखील त्यांनी कौतुक केले आहे.
अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवत असलेल्या विवेक रामास्वामी यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींना ते अद्याप वैक्तिकरित्या ओळखत नाहीत. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी मोदी आले होते, तेव्हा त्यांचे भाषण ऐकून रामास्वामी एक नेता म्हणून खूप प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
जॉर्जियाकडून ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून घोषित
विक्रम लँडरच्या सर्व उपकरणाचे काम संपले की नासाचे ‘एलआरए’चे ऍक्टिव्ह होईल
मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवावी
माध्यमांनी सामाजिक जाणिवा वाढवायला हव्यात!
रामास्वामी पुढे म्हणाले की, भारत अमेरिकेचा विश्वासार्ह भागीदार बनल्यास चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी हे चिंताजनक असेल.चीन-तैवान संघर्षाबाबत बोलताना ते म्हणाले, तैवानसोबतच्या संघर्षात लोक एक गोष्ट विसरले आहेत ते म्हणजे तेथील हिंदीमहासागर. हे असे ठिकाण आहे की, या ठिकाणावरून चीनला तेल पुरवठा केला जातो. भारत हा विश्वासार्ह भागीदार झाल्यास तर तो शी जीनपिंगसाठी मारक ठरू शकतो.