आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत आता अमेरिकाही सहभागी

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत आता अमेरिकाही सहभागी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये आता जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेला अमेरिका सहभागी झाला आहे. अमेरिका हे या आघाडीत सहभागी होणारे १०१ वे सभासद राष्ट्र ठरले आहे. अमेरिका या भागीदारीत सहभागी झाल्यामुळे ही आंतरराष्ट्रीय आघाडी अधिक बळकट झाल्याचे म्हटले जात आहे.

बुधवार, १० नोव्हेंबर रोजी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या करारवर स्वाक्षरी केली. जागतिक स्तरावर सौरऊर्जेच्या स्वीकाराला मोठी चालना देणारे एक पाऊल म्हणून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सभासदत्व स्वीकारल्याचे हवामान बदल या विषयातील अमेरिकेचे विशेष राजदूत जॉन केरी यांनी सांगितले. तर “ही काळाची गरज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होताना आम्हाला आनंद होत आहे.” असेही ते म्हणाले.

२०१५ साली आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा होलांद यांनी केली. ३० नोव्हेंबर २०१५ रोजी फ्रान्समध्ये पॅरिस येथे भरलेल्या (COP-21) या संयुक्त राष्ट्रांच्या २१ व्या हवामान बदल परिषदेत केली होती. यावेळी या आघाडीत सहभागी होण्यासाठी १२० देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित होते.

हे ही वाचा:

‘या’ महापुरुषाची जयंती ठरली जनजातीय गौरव दिवस

पराभवाच्या भीतीने शिवसेनेला हुडहुडी भरली

इंग्लंडला धूळ चारत न्यूझीलंड अंतिम फेरीत

दोन वर्ष MPSC परीक्षा नाही, पण मुदतवाढ मात्र वर्षभराचीच

याच महत्वपूर्ण अशा आंतरराष्ट्रीय आघडीत आता अमेरिकाही सहभागी झाला आहे. याबद्दल जॉन केरी यांनी बोलताना “काही तपशीलांवर काम केल्यानंतर या प्रक्रियेचा भाग बनताना आम्हाला आनंद होत आहे. जागतिक स्तरावर सौर ऊर्जेच्या वापरासाठी हे महत्त्वाचे योगदान आहे विशेषतः विकसनशील देशांसाठी हे जास्त महत्त्वाचे आहे” असे म्हणाले.

अमेरिकेच्या या निर्णयाचे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वागत केले आहे. “यामुळे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी चळवळ बळकट होईल आणि जगाला स्वच्छ ऊर्जा स्रोत पुरवण्याच्या भविष्यातील कृतीला चालना मिळेल”, असे ते म्हणाले.

Exit mobile version