27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनिया‘युद्धविराम हमासमुळेच संपला’

‘युद्धविराम हमासमुळेच संपला’

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांचा आरोप

Google News Follow

Related

कॉप २८ परिषदेसाठी दुबईत दाखल झालेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी गाझा पट्टीतील युद्धविराम संपण्यास हमासला दोषी ठरवले आहे. गाझा पट्टीमधून ओलिसांची सुटका करण्याच्या दिलेल्या वचनाचा हमासने भंग केल्याचा आरोप ब्लिंकेन यांनी केला.

हमासने जेरूसलेममध्येही दहशतवादी हल्ला केला. याकडे ब्लिंकेन यांनी लक्ष घेतले. गुरुवारी जेरूसलेममध्ये एका पॅलेस्टिनी बंदुकधाऱ्याने बसस्टॉपवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात तीनजण ठार तर आठ जखमी झाले होते. त्यानंतर हमासने निवेदन जाहीर करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

 

हमासने शुक्रवारीही इस्रायलवर रॉकेट डागली, असे ब्लिंकेन यांनी सांगितले. तसेच, गाझा पट्टीमधून इस्रायलच्या सीमेजवळच्या दक्षिणच्या किनाऱ्याजवळील अशोड शहरावरही सुमारे ५० रॉकेट डागली गेली, असे इस्रायली लष्करातर्फे सांगण्यात आले होते. त्याचा उल्लेखही ब्लिंकेन यांनी केला. अर्थात पुन्हा युद्धविराम घोषित व्हावा, यासाठी अमेरिका इस्रायलसोबत इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीने प्रयत्न करत आहोत, असेही ब्लिंकेन यंनी स्पष्ट केले. कतारनेही युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र इस्रायलने पुन्हा गाझामध्ये हल्ले करण्यास सुरुवात केल्याने गुंतागुंत वाढण्याची भीती आहे.

हे ही वाचा:

महिलेलाही बलात्कारप्रकरणी दोषी ठरवले जाऊ शकते?

गांगुली म्हणतात, “कर्णधार म्हणून रोहितच बेस्ट!”

महुआंच्या चौकशीचा अहवाल ४ डिसेंबरला लोकसभेत सादर होणार

अजित पवार निर्मित ‘बिनपैशाचा तमाशा’ सिझन-२

 

इस्रायल आणि हमास यांनी पुकारलेला सात दिवसांचा युद्धविरामाचा कालावधी शुक्रवारी संपला. या युद्धविरामाच्या बदल्यात हमासकडून १०५ इस्रायली नागरिकांची तर, इस्रायलच्या तुरुंगात कैद असलेल्या २४० पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. अजूनही १७ महिला आणि मुलांसह १३६ इस्रायली नागरिक हमासने गाझा पट्टीत ओलीस ठेवल्याचे इस्रायलच्या संरक्षण दलाचे प्रवक्ते रेअर ऍडमिरल डॅनिअल हंगारी यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा