अमेरिकेने घेतला १३ जवानांचा बदला

अमेरिकेने घेतला १३ जवानांचा बदला

आयएसआयएस-केच्या तळांवर ड्रोन हल्ला

अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या तीन बॉम्ब स्फोटांमध्ये १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या १३ सैनिकांचा समावेश होता. आयसिसने केलेल्या या हल्ल्याला आता अमेरिकेने प्रत्युत्तर दिलं आहे. अफगाणिस्तानमधील आयसीसच्या तळांवर अमेरिकेने ड्रोनच्या माध्यमातून बॉम्बचा वर्षाव केला आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यात काबुल हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही या हल्लेखोरांना माफी करणार नाही, या हल्लाला जशास तसं उत्तर देणार आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केलं होतं. काबुल हल्ल्यानंतर अमेरिकेवर मोठा दबाव होता.

काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आयसिसच्या खोरासन गटाने घेतली होती. हा गट ज्या ठिकाणी वास्तव्य करतो, म्हणजे नांगरहरच्या परिसरात अमेरिकेने बॉम्बचा वर्षाव केला आहे. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे.

अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या तीन बॉम्ब स्फोटांमुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या १३ सैनिकांचा समावेश आहे. तालिबानने या स्फोटांचा निषेध केला असून या स्फोटांची जबाबदारी आयएसआयएस-के (आयएसआयएस-खुरासन)  या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. हा दहशतवादी गट तालिबानचा कट्टर विरोधक असल्याचं समजलंय जातं. सत्तेच्या आणि वर्चस्वाच्या राजकारणामध्ये आयसिसचा हा गट तालिबान्यांचा कट्टर शत्रू म्हणून ओळखला जातोय.

हे ही वाचा:

नारायण राणेच्या नादी लागू नका…नाही तर मला सगळेच बोलावे लागेल

अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे

…म्हणून सध्या चवदार तळे आहे चर्चेत

‘कोळी समाजाला हद्दपार करण्याचे शिवसेनेचे कारस्थान’

काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यापेक्षा अधिक मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाने राष्ट्रपती ज्यो बायडेन यांना दिलं आहे. या हल्ल्याची शक्यता लक्षात घेता अमेरिकेने काबुल विमानतळाची सुरक्षा अधिक कडक केली आहे.

Exit mobile version