29 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
घरदेश दुनियाआता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?

आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?

Google News Follow

Related

तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता काबिज करुन आपला झेंडा फडकवला आहे. अफगाणिस्तानचं नवं सरकार म्हणून तालिबानने स्वत:ला घोषित केलं आहे. मात्र जगभरातील देश तालिबान्यांना स्वीकारण्यास तयार नाहीत. जगभरातून राष्ट्र प्रमुखांच्या प्रतिक्रिया, अफगाणिस्तानमधील चिघळलेली परिस्थिती तालिबान्यांना विरोध करण्यास पुरेशी आहे. आता फेसबुकनेही तालिबानला आपल्या प्लॅटफॉर्मवरून बॅन केलं आहे. अमेरिकन कायद्यांन्वये तालिबान एक दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे आम्ही त्यांची सेवा बंद करत आहोत, असं फेसबुकच्या प्रवक्तांनी म्हटलं आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून पळ काढल्यावर अमेरिकेवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. त्यामुळे फेसबुकने केलेल्या या कारवाईवरही मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिका आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिका तालिबानला रोखणार का? असा सवाल समाज माध्यमांमधून केला जात आहे.

फेसबुकने एक परिपत्रक जारी करत म्हटलं की, आमच्या धोरणांनुसार, दहशतवादी संघटनेला आमच्या प्लॅटफॉर्ववर स्थान दिले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तालिबान किंवा त्याच्याशी संबंधित कोणतेही अकाऊंट, पोस्ट फेसबुकवर दाखवली जाणार नाही.

हे ही वाचा:

अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला

अफगाणिस्तानच्या मदतीला भारत गेला धावून

तालिबानकडून महिलांना ‘अभय’ दिल्याची घोषणा

अफगाणिस्तानमध्ये विमानातही चेंगराचेंगरी

आम्ही आमच्या टीममध्ये अफगाणिस्तानमधील तज्ञांचा समावेश केला आहे, ज्यांना पश्तो आणि डारी भाषेची माहिती आहे. जेणेकरून तालिबानला पाठिंबा देणारी कोणतीही पोस्ट आल्यास त्यावर कारवाई करता येईल. अनेक तालिबान प्रवक्ते, नेते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह आहेत. यापैकी अनेकांची फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट्स आहेत. तिथून ते सातत्याने स्टेटमेंट जारी करतात. आता फेसबुकने ही कारवाई केल्याने प्रत्येकाच्या नजरा ट्विटरसह इतर प्लॅटफॉर्मवर आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा