25 C
Mumbai
Wednesday, May 7, 2025
घरदेश दुनियाअमेरिकेने येमेनमधील इंधन बंदरावर केलेल्या हल्ल्यात ३८ ठार

अमेरिकेने येमेनमधील इंधन बंदरावर केलेल्या हल्ल्यात ३८ ठार

हुती बंडखोरांना धडा शिकविण्याचा उद्देश

Google News Follow

Related

येमेनमधील एका इंधन बंदरावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांत किमान ३८ लोक ठार आणि १०२ लोक जखमी झाले आहेत. अमेरिकन सैन्याच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांचा उद्देश ईरान समर्थित हूती गटाच्या इंधनपुरवठ्याच्या स्रोतांना संपवणे होता. या घटनांना हूती गटाविरुद्ध सुरू झालेल्या अमेरिकी कारवायांतील आतापर्यंतचे सर्वात प्राणघातक हल्ले मानले जात आहे.

अल मसीरा टीव्ही, जे हूती गट चालवतो, त्याच्या अहवालानुसार, गुरुवारी पश्चिम यमनमधील ‘रास ईसा’ इंधन बंदरगाहावर हे हल्ले झाले. दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हल्ल्यांची प्राथमिक माहिती दिली असून, याशिवाय अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

एका अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे, की, “या हल्ल्यांचा उद्देश हूती गटाच्या आर्थिक स्त्रोतांना कमजोर करणे हा होता. हा गट स्वतःच्या देशवासीयांचेच शोषण करतो आणि त्यांना पछाडतो. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जानेवारीतील सत्ता स्वीकारल्यानंतर, हे मध्यपूर्वेतील अमेरिकेद्वारे राबवलेले सर्वात मोठे सैनिकी अभियान मानले जात आहे. वॉशिंग्टनने स्पष्टपणे सांगितले आहे की, ही कारवाई तेव्हाच थांबवली जाईल, जेव्हा हूती गट लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले थांबवेल.

हे ही वाचा:

१० हजारांचा जमाव, प्रचंड जाळपोळ, पोलिसांवर हल्ले, हिंदू कुटूंब हेच लक्ष्य… मुर्शीदाबादेचे भयावह वास्तव आले समोर

छत्तीसगडमध्ये ३३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; १७ जणांवर ४९ लाखांचे बक्षीस

‘मी बाजीगर आहे, हार मानत नाही!’

पूर्वांचलची पूजा यादव थेट भारतीय संघात!

नोव्हेंबर २०२३ पासून, हूती बंडखोरांनी लाल समुद्रातून जाणाऱ्या जहाजांवर डझनभर ड्रोन्स आणि मिसाइल हल्ले केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, हे हल्ले ते गाझामधील युद्धाच्या निषेधार्थ इजरायलशी संबंधित जहाजांवर करत आहेत. गाझामधील दोन महिन्यांच्या युद्धविराम काळात हूती गटाने हे हल्ले थांबवले होते. मात्र इजरायलने पुन्हा हल्ले सुरू केल्यावर त्यांनी आपली कारवाई पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली — जरी त्यांनी अद्याप कोणताही हल्ला मान्य केलेला नाही.

२०१४ पासूनच सुरू आहे युद्ध

२०१४ पासून सुरू असलेल्या गृहयुद्धात, हूती गटाने उत्तरी येमेनमधील बहुतांश भागांवर नियंत्रण मिळवले आहे.
ते अमेरिकेच्या हल्ल्याला उत्तर देत राहतील, अशी स्पष्ट भूमिका गटाने घेतली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
246,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा