अमेरिका म्हणते , नरेंद्र मोदीच रशिया – युक्रेन युद्ध थांबवू शकतात,

अमेरिकेने दाखवला पुन्हा एकदा विश्वास

अमेरिका म्हणते , नरेंद्र मोदीच रशिया – युक्रेन  युद्ध थांबवू शकतात,

समरकंदमध्ये झालेलया शिखर परिषदेच्यावेळी पंतप्रधांनांनी पुतीन यांना हे युद्धाचे युग नाही असा सल्ला दिला होता. त्यांच्या या स्पष्ट भूमिकेचे जगभरातून स्वागत करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्याच प्रत्यय आला आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच हे युद्ध थांबवू शकतात, असे अमेरिकेने म्हटले आहे.अमेरिकेने पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून मोदी अजूनही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युद्ध थांबवण्यासाठी राजी करू शकतात असे वक्तव्य केले आहे.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल दोन दिवसांपूर्वी रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून परतले आहेत. या काळात डोभाल यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशीही दीर्घ चर्चा केली होती. त्यानंतर अमेरिकेकडून हे विधान आले आहे. शुक्रवारी व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी माध्यमांशी संवाद सोडला. त्यावेळी माध्यमांनी किर्बी यांना रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या मध्यस्थीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी किर्बी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याकडे युद्ध थांबवायला अजून वेळ आहे. युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उचललेल्या पावलांचं आम्ही समर्थन करू अशी प्रतिक्रिया दिली.

इतकेच नाही तर जॉन किर्बी पुढे म्हणाले की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे युद्ध थांबवायला अजून वेळ आहे आणि केवळ पंतप्रधान मोदीच त्यांना तसे करण्यास पटवून देऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धा संदर्भात बोलले तर त्यांच्या प्रयत्नांचे अमेरिका स्वागत करेल.

हे ही वाचा:

महान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दिनदयाळ उपाध्याय

फक्त ५०० रुपये दिले नाहीत म्हणून केला खून

रोहित पवारांनी राहुल-राऊतांना खुळ्यात काढले?

उद्धव ठाकरेंच्या शब्दाला किंमत राहिली नाही का?

मोदी म्हणाले होते, आज युद्धाचे युग नाही
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेच्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी हे युद्धाचे युग नाही असा सल्ला दिला होता. मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करू शकतात आणि त्यांना हे युद्ध थांबवण्यासाठी राजी करू शकतात. असे केल्याने दोन्ही देशांमधील वैर संपेल असा विश्वास जॉन किर्बी यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version