अमेरिका आपले सैन्य युक्रेनमध्ये पाठवणार नाही!

अमेरिका आपले सैन्य युक्रेनमध्ये पाठवणार नाही!

तरीही या पद्धतीने अमेरिका करणार युक्रेनला मदत

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी २४ फेब्रुवारीला युक्रेनमध्ये लष्करी हल्ले सुरू केल्याबद्दल रशियाचा निषेध केला होता. याबाबत बायडेन यांनी सांगितले आहे की, अमेरिका आणि नाटो सैन्य रशियाशी युद्ध करणार नाही. तसेच, रशियाच्या निर्यात, बँका आणि उद्योगपतींवर नवीन निर्बंधांची घोषणा केली आहे. युरोपियन युनियनचे २७ सदस्य आणि जी-७ सदस्यही या निर्बंधांमध्ये सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले आहे.

रशिया देशाला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली आहे. आता त्याचे परिणाम आता त्यांना आणि रशिया देशाला भोगावे लागणार आहेत. अमेरिकन सैन्य युक्रेनमध्ये जाणार नाही, परंतु युक्रेनच्या प्रत्येक इंचाचे संरक्षण करणार असल्याचे बायडेन यांनी आश्वासन दिले आहे.

बायडेन यांनी रशियावर पहिली कारवाई म्हणून आर्थिक निर्बंधांची सुरवात केली आहे. यामध्ये आता मॉस्को डॉलर, पौंड, युरो इत्यादींमध्ये व्यापार करता येणार नाही. जो बायडेन म्हणाले, पुतीन यांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत, त्यांना जुना सोव्हिएत संघ पुन्हा स्थापित करायचा आहे. मात्र आम्ही लावलेल्या निर्बंधांचा प्रभाव रशियावर उशिरा होईल, पण जो प्रभाव असेल तो रशियाला नक्कीच जाणवेल.

हे ही वाचा:

श्रीलंकेच्या भारतीय राजदूतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट

नवाब मलिकांचा मुलगा फराझला लवकरच ईडीकडून समन्स

श्रीलंकेच्या भारतीय राजदूतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट

‘यशवंत जाधवांवर झालेल्या कारवाईचे स्पष्टीकरण पक्षप्रमुखांनी द्यावे’

जी -७ देशांनी रशियाविरूद्ध विनाशकारी निर्बंधांसह इतर आर्थिक उपायांवर पुढे जाण्यास सहमती दर्शविली आहे. याबद्दल ट्विट करत बायडेन म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या अयोग्य हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी आपण त्यांच्या जी-७ समकक्षांशी भेट घेतली आणि यावेळी या गोष्टींवर सहमती झाली आहे.

Exit mobile version