रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर ५००हून अधिक नवे निर्बंध लादले आहेत. अमेरिकेसह ब्रिटन आणि युरोपियन संघानेही रशियाच्या विरोधात नवे निर्बंध लादले आहेत. निडर भ्रष्टाचारीविरोधी कार्यकर्ते एलेक्सी नवलनी यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर रशियावर आणखी निर्बंध लादत असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी केली.
‘या निर्बंधांमुळे नवलनी यांच्या कारावासाशी संबंधित व्यक्तींसह रशियातील वित्तीय क्षेत्र, संरक्षण, औद्योगिक आणि खरेदी दळणवळणासह अन्य क्षेत्रांना फटका बसेल. पुतिन यांच्या आक्रमकतेचा फटका त्यांना जगभरातूनच बसेल, यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. अमेरिकेसह जगभरातील ५० देश रशियाच्या विरोधात युक्रेनसोबत उभे आहेत. त्यांच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असे त्यांनी सांगितले. बायडेन यांनी अप्रत्यक्षरीत्या रशियाला मदत करणाऱ्या १०० संस्थांवर नवे निर्यात निर्बंध लादले आहेत. ब्रिटननेही रशियावर निर्बंध लादले आहेत.
हे ही वाचा:
धक्कादायक! नवजात बाळ रडू नये म्हणून तोंडाला लावली ‘टेप’!
‘राहुल गांधी यांना भेटण्यासाठी १० किलो वजन कमी करण्यास सांगितले गेले’!
संदेशखालीत शाहजहान शेखच्या भावाची मालमत्ता ग्रामस्थांनी जाळली, पुन्हा हिंसाचार!
संदेशखाली वादात शाहजहान शेखवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल!
तसेच, युरोपीय संघाने शुक्रवारी भारतासह रशिया, चीन, कजाकिस्तान, सर्बिया, थायलंड आणि तुर्कीतील २७ कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. अर्थात या कंपन्यांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. या कंपन्यांनी सैनिक आणि नागरिक या दोन्हींचा वापर केल्याचा आरोप आहे.