रेड सीमधील हुतींच्या कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिका- ब्रिटनचा एअरस्ट्राईक

येमेनमधील हुतींची ठिकाणे केली लक्ष्य

रेड सीमधील हुतींच्या कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिका- ब्रिटनचा एअरस्ट्राईक

जगात सध्या रशिया- युक्रेन आणि इस्रायल- हमास अशी दोन युध्द सुरू आहेत. अशातच नव्या युद्धाला तोंड फुटतंय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे आहे. अमेरिकेने ब्रिटनच्या साथीने थेट हुती बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून अमेरिकेने आणि ब्रिटनने एअरस्ट्राईक केला आहे. रेड सीमधील त्यांची दादागिरी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

रेड सीमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या हुती बंडखोरांच्या ठिकाणांवर अमेरिका- ब्रिटनने मिळून हवाई हल्ले केले आहेत. लाल समुद्रात हुती बंडखोर गेल्या काही दिवसांपासून उपद्रवी कारवाया करत आहेत. ते अमेरिका- ब्रिटनच्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करत होते. गुरुवारी सुद्धा त्यांनी हल्ला केला होता. त्यांच्या या कृत्यांवर आळा बसवण्यासाठी म्हणून अमेरिका आणी ब्रिटनने हे पाऊल उचलले. येमेनमध्ये हुती बंडखोरांची काही ठिकाणे आहेत. तिथे अमेरिका आणि ब्रिटनने मिळून मोठा हवाई हल्ला केला. हवाई हल्ल्यानंतर येमेनच्या अनेक शहरात बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत होते. हुती बंडखोरांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल आहे.

राजधानी सनासह अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिका आणि ब्रिटनच्या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात आगीच्या ज्वाळा आणि धूराचा लोट उठताना दिसतो आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यात येमेनच मोठ नुकसान झाल्याची माहिती आहे. अमेरिका आणि ब्रिटनच्या या संयुक्त कारवाईनंतर हुती बंडखोर सुद्धा मोठा हल्ला करु शकतात. त्यांच्याकडून तसा इशाराही देण्यात आला आहे.

हुती बंडखोर ही इराणने पोसलेली संघटना आहे. इस्रायल-हमास युद्धात हुती बंडखोर हमासच्या बाजूने आहेत. इस्रायलने हल्ले रोखावेत, यासाठी त्यांच्याकडून लाल सागरात इस्रायलच्या समर्थक देशांच्या जहाजांवर हल्ले सुरु होते. हुती बंडखोरांना अमेरिकेकडून बऱ्याच दिवसांपासून इशारे दिले जात होते. अखेर अमेरिकेने थेट कारवाईच केली आहे.

हे ही वाचा:

जय श्रीराम: राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदींचे ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान

‘अग्निपथ योजनेला सर्वांचीच मान्यता’

ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या पाच दिवसांनंतरही शाहजहां यांचा ठावठिकाणा नाही!

राम मंदिराचे आमंत्रण धुडकावल्याने काँग्रेसमध्येच नाराजी!

रेड सी म्हणजेच लाल समुद्रात हुती बंडखोरांनी आतापर्यंत २७ हल्ले केले आहेत. यात ५० हून अधिक देशांना त्रास झाला आहे. लाल सागरात होणाऱ्या या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी २ हजारपेक्षा अधिक जहाजांना हजारो मैल लांबून प्रवास करावा लागत आहे.

Exit mobile version