अमेरिका पाठवणार कोविड लसीचा कच्चा माल

अमेरिका पाठवणार कोविड लसीचा कच्चा माल

अजित डोवाल यांच्या मुत्सद्देगिरीला यश

कोवीड महामारीत अमेरिका भारताला संपूर्ण सहकार्य करेल असे बायडन प्रशासनाकडून आश्वस्त करण्यात आले आहे. मैत्री धर्म निभावत अमेरिका भारताला शक्य ते सर्व सहकार्य करेल असे सांगण्यात येत आहे. अमेरिका आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये रविवारी बातचीत झाली. त्यानंतर अमेरिकेकडून भारताला सर्व आवश्यक त्या कच्च्या मालाचा पुरवठा करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवन यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून कोविशील्ड लसीचा कच्चा माल पुरवठा रोखला गेला होता.

हे ही वाचा:

लसीकरणाच्या घोषणेची ‘मोफत’ डोकेदुखी

५५१ ऑक्सिजन प्लॅन्ट्स उभारायला मोदी सरकारची मंजुरी

महाराष्ट्रातही होणार मोफत लसीकरण

बीपीसीएल परिसरात जम्बो कोविड सेंटरला मोदी सरकारची परवानगी

कोविड महामारीचा भारत-अमेरिका एकत्र सामना करतील.
अजित डोवाल आणि सुलिवन यांच्या संभाषणानंतर अमेरिकेकडून काढण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात भारताला कोविड लसीच्या कच्च्या मालाचा पुरवठा करणार असल्याचे म्हटले आहे. या पत्रकात असे म्हणण्यात आले आहे की,

“अजित डोवाल आणि सुलिवन यांच्यात आज फोनवरून संभाषण झाले या संभाषणात भारताच्या कोवीड परिस्थितीबद्दल अमेरिकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली. भारत आणि अमेरिकेत सात दशकांची वैद्यकीय भागीदारी आहे. पोलिओपासून एड्सपर्यंत सर्वांचाच एकत्र सामना केला आहे. त्याप्रमाणेच भारत आणि अमेरिका कोविड महामारीचाही एकत्रित सामना करतील. जसे महामारीच्या सुरवातीला भारताने अमेरिकेची मदत केली होती तसेच अमेरिकाही भारताला गरज असताना मदत करायला कटिबद्ध आहे.

उपलब्ध असलेल्या संसाधनांचा पुरवठा करण्यासाठी अमेरिका घड्याळाच्या काट्यावर काम करत आहे. कोविशील्ड लसीच्या भारतीय उत्पादकांना अवश्यक असलेल्या कच्चा मालाचा स्रोत आम्ही शोधला असून भारताला लगेच त्याची उपलब्धता करून दिली जाणार आहे.”

तसेच या सोबतच अमेरिकेकडून कोविड चाचण्यांचे किट्स, पीपीई किट, व्हेंटीलेटर्स या गोष्टीही पाठवण्यात येणार आहेत

Exit mobile version