९/११ च्या आधी अमेरिकेची अफगाणिस्तानातून माघार

९/११ च्या आधी अमेरिकेची अफगाणिस्तानातून माघार

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय फौजा येत्या काही काळात अफगाणिस्तानातून माघार घेणार आहेत. सप्टेंबरच्या आधीपर्यं या फौजा माघार घेतील असे समजत आहे.

११ सप्टेंबरला ‘९/११’ च्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात अमेरिकेचा शिरकाव झाला होता. त्यामुळे या दिवसापूर्वीच अमेरिका अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेणार आहे.

हे ही वाचा:

शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात

मे महिन्यात स्पुतनिक-५ उपलब्ध होणार?

छगन भुजबळांकडून मोदी सरकारचे कौतुक

‘रेमडेसिवीर’ काळा बाजाराचा मालवणी पॅटर्न

अमेरिकेचे सैन्य जरी माघारी फिरले तरीही, तेथील राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेएवढे जवान अफगाणिस्तानात तैनात राहणार आहेत. घुसखोरीविरुद्ध लढण्यासाठी अथवा प्रशिक्षणासाठी  सैनिक ठेवण्यात येणार नाहीत. त्याबरोबरच ही माघार इतर भागीदारांशी चर्चा केल्यानंतर घेतली जाणार आहे.

ट्रम्प प्रशासनाने तालिबानसोबत केलेल्या करारानुसार अमेरिकी सैन्याने १ मेपर्यंत अफगाणिस्तानातून निघून जाणे अपेक्षित होते. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे याबाबत नवी मुदत जाहीर करतील अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांनी याबाबत असमर्थता व्यक्त केली. “आम्ही निघून जाऊ. आम्ही फार काळ थांबणार नाही, प्रश्न फक्त एवढाच की आम्ही केव्हा निघून जाणार” असे जो बायडन म्हणाले होते.

अफगाणिस्तानात सध्या अमेरिकेचे २,५०० ते ३,५०० सैनिक तैनात आहेत. त्याबरोबरच त्यांच्या गटबंधनाचे मिळून सुमारे ८,५०० सैनिक तैनात आहेत.

Exit mobile version