दिवाळी हा अमेरिकेतही राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावा यासाठी बुधवारी न्यूयॉर्कमधील खासदार कॅरोलिन बी मलोनी यांच्या नेतृत्वाखाली, खासदारांनी हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हमध्ये प्रस्ताव सादर केला.
मॅलोनी यूएस कॅपिटल येथे एका कार्यक्रमात म्हणाल्या की, “या आठवड्यात काँग्रेसच्या इंडियन कॉकसच्या सदस्यांसह दीपावली डे कायदा सादर करताना मला खूप आनंद होत आहे. हे विधेयक दिवाळीला एक फेडरल सुट्टी म्हणून कायद्यात समाविष्ट करेल.”
ऐतिहासिक कायदा भारतीय-अमेरिकन काँग्रेसवुमन राजा कृष्णमूर्ती यांच्यासह अनेक खासदारांनी सहप्रायोजित केला आहे. कृष्णमूर्ती यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये दिवाळीचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व ओळखून एक ठरावही मांडला आहे.
मॅलोनी म्हणाले की, यावर्षीची दिवाळी ही कोविड-१९ च्या अंधारातून देशाच्या सततच्या प्रवासाचे प्रतीक आहे. “मला तुमच्यासोबत अंधारावर प्रकाशाचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय संपादित केल्याचा आनंद साजरा करताना खूप अभिमान वाटतो.
हे ही वाचा:
लख लख चंदेरी तेजाची न्यारी अयोध्या
पुढली कारसेवा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल
भाजपाशासित राज्यांनी कमी केला पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट
नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन: वाईटाचा वध करून सकारात्मकतेचा दिवस
“दिवाळीसारखे सण आपण देश म्हणून ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो त्या मूल्यांना साजरे करतात. आरोग्याचे, आनंदाचे, शिक्षणाचे आणि प्रकाशाचे प्रतिक असलेला हा सण आहे. माझे सहकारी, भारतीय-अमेरिकन समुदायाचे नेते आणि माझा असा विश्वास आहे की या भयंकर गडद महामारीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीला फेडरल सुट्टी म्हणून घोषित करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ नाही.” असं मलोनी म्हणाल्या.
हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीचे अध्यक्ष, ग्रेगरी मीक्स यांनी या कायद्याचे समर्थन केले. “ही अशी गोष्ट आहे जी, अमेरिकन समाजात आपल्या सर्वांबरोबर सामायिक केले पाहिजे. हा दिवस चांगला आहे, कारण आपण अंधारावर प्रकाशाबद्दल बोलत आहोत.” असं मीक्स म्हणाले.