अमेरिकेने केलेल्या लष्करी हल्ल्यात जवळपास ३० इस्लामी अल-शबाब सैनिक ठार झाले आहे. सोमालियातल्या सोमाली गलकाड शहराजवळ २६० किलोमीटर ईशान्य भागात हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कोणतेही नागरिक जखमी किंवा ठार झाले नाहीत. अमेरिकन सैन्याने सोमालिया नॅशनल आर्मीच्या समर्थनार्थ सामूहिक स्व-संरक्षण हल्ला केला आहे. ही दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित असल्याचे म्हटल्या जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दहशतवादी गटाचा मुकाबला करण्यासाठी या प्रदेशात अमेरिकन सैन्य पुन्हा तैनात करण्याच्या पेंटागॉनच्या विनंतीला मान्यता दिली होती . तेव्हापासून अमेरिकन सैन्य सोमाली सरकारला पाठिंबा देत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२० मध्ये देशातून सर्व अमेरिकन सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
सोमालियाचे लष्कर आणि अल शबाब यांच्यात लढाई सुरु असतानाच हा हल्ला करण्यात आला. यामध्ये अल शबाबचे किमान ३० सैनिक ठार झाले आहेत. अमेरिकेने सोमालियातील अल-शबाबच्या लक्ष्यांवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अमेरिकेने अनेकवेळा आपल्या तळांवर हल्ले केले आहेत, ज्यात अल-शबाबचे अनेक सैनिक मारले गेले आहेत.
हे ही वाचा:
क्रिकेटपटू उमेश यादवला ४४ लाखांचा गंडा
कोविड काळात रेमडेसीवीर औषधाचा काळाबाजार
राऊत यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणुकही लढवावी
अमेरिकन सैन्याने अलिकडच्या काही महिन्यांत या भागात अनेक हल्ले केले आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये, अमेरिकेच्या हल्ल्यात मोगादिशूच्या वायव्येस२१८ किलोमीटर अंतरावर अल-शबाबचे दोन सदस्य ठार झाले. नोव्हेंबरमध्ये मोगादिशूच्या ईशान्येस२८५ किलोमीटर अंतरावर अल-शबाबचे १७ सैनिक ठार झाले, तर डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या दुसर्या हल्ल्यात राजधानीच्या ईशान्येस सुमारे १५० मैल अंतरावर असलेल्या कदेल शहराजवळ अल-शबाबचे सहा अतिरेकी ठार झाले.