23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनियाउरी हल्ल्यातील आयएसआयच्या भूमिकेवरून अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले

उरी हल्ल्यातील आयएसआयच्या भूमिकेवरून अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले

भारताचे माजी राजदूत बिसारिया यांचा दावा

Google News Follow

Related

सन २०१६मध्ये उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचे पुरावे मिळताच अमेरिकेने पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना फटकारले होते, असा दावा भारताचे माजी राजदूत अजय बिसारिया यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात केला आहे.

सप्टेंबर २०१६मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १९ भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर अमेरिकेच्या पाकिस्तानमधील राजदूतांनी शरीफ यांची भेट घेतली होती. हा दहशतवादी हल्ला पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदने केला होता, मात्र अमेरिकेने त्यावेळी नवाझ शरीफ यांना फाइल देऊन त्यात उरी हल्ल्याचा कट आखण्यात आयएसआयचा हात असल्याचे पुरावे दिले होते. हे पुरावे बघितल्यानंतर शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्कराला जाब विचारला. मात्र त्यामुळे अशा काही घटना घडल्या की, नवाझ शरीफ यांना सन २०१७मध्ये पंतप्रधानपदावरून पदच्युत करण्यात आले आणि त्यांना स्वतःला २०१८ मध्ये पाकिस्तान सोडून जावे लागले होते.

उरी हल्ल्यावरून अमेरिकेने शरीफ यांना फटकारल्याचे वृत्त याआधी आलेले नाही. तसेच, बिसारिया यांनी त्या राजदूताचे नाव घेतलेले नसले तरी त्यावेळी पाकिस्तानमधील अमेरिकेच्या राजदूतपदी डेव्हिड हेले होते. उरी हल्ल्यातील आयएसआयच्या भूमिकेबद्दल अमेरिकेने दिलेल्या माहितीमुळे ‘हताश’ झालेल्या शरीफ यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात राजकीय आणि लष्करी नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री एजाझ अहमद चौधरी यांनी एक सादरीकरण करून देशाला “राजनैतिक अलिप्ततेचा सामना करावा लागला असल्याचे नमूद केले होते. तसेच, पठाणकोट हल्ल्याच्या तपासानंतर जैश-ए-मोहम्मदविरुद्ध काही ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगितले होते. यामुळे क्रोधित झालेल्या आणि नामुष्कीची वेळ आलेल्या पाकिस्तान लष्कराला ही बाब सहन झाली नाही.

पाकिस्तान लष्कराच्या लेखी एका सर्वसामान्य नागरिक दहशतवाद्यांना शेजारच्या देशात तैनात करण्याच्या त्यांच्या ‘सुरक्षा धोरणा’वर सार्वजनिकपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करत होता. नवाझ शरीफ यांना हटवण्याची वेळ आली होती. पंतप्रधानांच्या राष्ट्रीय हिताच्या हेतूवरच शंका उपस्थित करून लष्कराने नवाझ शरीफ यांच्यावर देशद्रोहाचे आरोप करण्यास सुरुवात केली, असे बिसारिया यांनी त्यांच्या ‘अँगर मॅनेजमेंट : द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान’ या पुस्तकात नमूद केले आहे.

हे ही वाचा:

यंदा कर्तव्यपथावर ‘शिवराज्याभिषेक’

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आता सुसाट; प्रकल्पाचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण

लक्षद्वीप मुद्द्यावरून इस्रायल भारताच्या पाठीशी; मोठ्या प्रकल्पाची घोषणा

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टांगती तलवार

त्यानंतर सन २०१७मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांच्या कुटुंबीयांचे परदेशस्थ कंपनीशी साटेलोटे असल्याच्या पनामा पेपर्सच्या हवाल्याने त्यांना कोणतेही सार्वजनिक पद स्वीकारण्यापास अपात्र ठरवले. पाकिस्तानचे तत्कालीन सरन्यायाधीश साकिब निसार यांनीही नुकतेच लष्करानेच शरीफ यांना शिक्षा सुनावण्यास सांगितल्याची कबुली दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा