अमेरिकेच्या दोन युद्धनौका तैवानजवळ दिसताच चीन म्हणाला…

तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन या दोन देशांमधला वाद पुन्हा एकादा समोर आला आहे.

अमेरिकेच्या दोन युद्धनौका तैवानजवळ दिसताच चीन म्हणाला…

तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन या दोन देशांमधला वाद पुन्हा एकादा समोर आला आहे. नुकतेच अमेरिकेच्या नौदलाची दोन जहाजं तैवानच्या जवळून गेली आहेत. यावर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. पण अमेरिकेच्या या चालीमुळे तैवान वरून चीन अमेरिका पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

अमेरिकन संसदेच्या सदस्या नॅन्सी पेलोसी या काही दिवसांपूर्वी तैवान दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यात आता अमेरिकेच्या नौदलाची दोन जहाजं तैवान जवळून गेल्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. “आम्हाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करू नका,” असा स्पष्ट संदेश चीनने अमेरिकेला दिला आहे. तर चीनने या अमेरिकन जहाजांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. चिनी नौदल कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचंही चीनने म्हटले आहे.

अमेरिकन नौदलाचे दोन जहाज तैवान मार्गाने गेल्यावर अमेरिकेनं आपली बाजू मांडली आहे. USS Antietam आणि USS Chancellorsville ही अमेरिकन नौदलाची दोन्ही जहाज नियमित मार्गावर चालवण्यात येत आहेत. या युद्धनौका किनारी राज्याच्या प्रादेशिक समुद्रापासून दूर असलेल्या जलडमरुमध्यतील एका कॉरिडॉरमधून पुढे गेल्या.

हे ही वाचा:

राम मंदिराचे ४० टक्के काम पूर्ण, या दिवशी भाविकांना घेता येणार दर्शन

भारताचे ‘हार्दिक’ अभिनंदन; पाकिस्तानला नमविले

‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’

गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार

अमेरिकन संसदेच्या सदस्या नॅन्सी पेलोसी या चीनने इशारा देऊनही तैवान दौऱ्यावर गेल्या होत्या. नॅन्सी यांच्या आगमनावेळी चीननं बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली होती. त्यांचा दौरा झाल्यानंतर चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानवर घिरट्या घातल्या होत्या. दुसरीकडे पेलोसी यांच्या सुरक्षेसाठी प्रवासादरमयान अमेरिकेच्या तेरा लढाऊ विमानांचं सुरक्षा कवच देण्यात आले होते.

Exit mobile version