मोदी यांच्या नेतृत्वात भारताची उत्कृष्ट कामगिरी!

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले कौतुक

मोदी यांच्या नेतृत्वात भारताची उत्कृष्ट कामगिरी!

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच, भारत देश मोदी यांच्या नेतृत्वाखाली असामान्य गोष्ट घडवून आणत आहे,’ हे कौतुकाचे शब्द आहेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांचे. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्व आर्थिक मंच शिखर संमेलनासाठी भारतासह तमाम देशांचे वरिष्ठ मंत्री आणि नेते सहभागी झाले आहेत. त्यानिमित्त तिथे आलेल्या ब्लिंकन यांनी भारताबद्दल कौतुकोद्गार काढले.

आमचा एकमेकांवर विश्वास
दावोसमध्ये एका मुलाखतीदरम्यान त्यांना भारताबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी भारताबद्दल कौतुकोद्गार काढले. ‘ भारत सातत्याने यशोगाथा लिहित आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जी प्रगती केली आहे, त्या उल्लेखनीय कामगिरीचे आम्ही साक्षीदार आहोत. भारत आता नव्या स्थानी आहे, नव्या स्तरावर आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती बायडन सातत्याने विकासावर काम करत आहेत. दोन्ही देश अनेक क्षेत्रांत एक दुसऱ्यासोबत काम करत आहेत. आमचा एकमेकांवर विश्वास आहे,’ असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

हुती गटाच्या हल्ल्याला अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर!

पाकिस्तानचा पलटवार; इराणवर एअर स्ट्राईक

धावपट्टी परिसरात प्रवाशांची पंगत; इंडिगोला एक कोटी २० लाखांचा तर, मुंबई विमानतळाला ९० लाखांचा दंड!

पवारांच्या नैराश्याचे कारण जाणून घ्या…

हिंदू राष्ट्रवादाच्या उदयाबद्दल वक्तव्य करणे टाळले
मोदी यांच्या कार्यकाळात देशाची मजबूत आर्थिक प्रगती आणि पायाभूत सुधारणा होत असूनही भारतात हिंदू राष्ट्रवादाचा उदय हा चिंतेचा विषय आहे का, यावर ब्लिंकन यांनी थेट भाष्य करणे टाळले. ‘ अमेरिका आणि भारत नेहमीच विविध विषयांवर चर्चा करतात. त्यात लोकशाही आणि अन्य मूलभूत अधिकारांशी संबंधित सर्व पैलूंचा समावेश आहे. आम्ही नेहमीच वास्तव विषयांवर चर्चा करत असतो,’ असे उत्तर त्यांनी दिले.

Exit mobile version