अमेरिकेतील शाळेत १४ वर्षीय विद्यार्थ्याकडून गोळीबार; चार जणांचा मृत्यू

गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

अमेरिकेतील शाळेत १४ वर्षीय विद्यार्थ्याकडून गोळीबार; चार जणांचा मृत्यू

अमेरिकेमधील जॉर्जिया शहरातील एका शाळेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. जॉर्जिया येथील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने वर्गात गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांसह चार जण ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

अमेरिकेतील जॉर्जियाच्या बॅरो काउंटीमधील अपलाची हायस्कूलमध्ये गोळीबार झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हुन अधिक लोक जखमी झाले आहेत. ही शाळा जॉर्जिया राज्याची राजधानी अटलांटापासून सुमारे ४५ मैल (७० किलोमीटर) ईशान्येस विंडर शहरात आहे. संशयित हल्लेखोर विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून कोल्ट क्रे असे या १४ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे.

आरोपी मुलगा जॉर्जियातील विंडर येथील अपलाची हायस्कूलचा विद्यार्थी आहे. गोळी झाडणारा विद्यार्थी हा हल्ल्यापूर्वी वर्गात शांत बसला होता. मात्र, अचानक त्याने गोळीबार करताच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी डेस्कच्या मागे लपून आपला जीव वाचवला. शाळेतून एकामागून एक गोळ्यांच्या अनेक राऊंडचे आवाज ऐकू येत होते. अनेकांनी जमिनीवर झोपत आपले संरक्षण केले. चार जणांचा मृत्यू यात झाला.

हे ही वाचा:

बहराइचमधील लांडग्यांना पकडण्यासाठी ‘टेडी बिअर’चे जाळे !

सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद!

रामगिरी महाराजांना ‘सर तन से जुदा’ची धमकी देणाऱ्या मुहम्मद सादला ठोकल्या बेड्या

मोदींच्या दौऱ्यानंतर आता चेन्नई ते ब्रुनेई…

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या घटनेचा निषेध केला असून गोळीबाराच्या घटनेत बळी पडलेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे. भविष्यात बंदुकीच्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी अमेरिकेत बंदूक सुरक्षा कायद्याची मागणी होत आहे. मृतांमध्ये दोन विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. या गोळीबाराचे कारण पोलिसांकडून शोधण्यात येत आहे. तसेच या विद्यार्थ्याला हल्ल्यासाठी प्रवृत्त केले होते का? याचाही तपास घेतला जात आहे. शाळेत घडलेल्या या घटनेने विद्यार्थी तसेच पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version