इराणने ईशान्य सीरियातील देखभाल सुविधा तळावर ड्रोन हल्ला केला आहे. गुरुवारी झालेल्या या हल्ल्यात या हल्ल्यातअमेरिकेचे पाच सैनिक आणि इतर अमेरिकन कंत्राटदाराचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.. पेंटागॉनने याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड फोर्सने या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले असल्याचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी गुरुवारी उशिरा प्रसिद्ध केलेल्या केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
इराणकडून अचूक हवाई हल्ले करण्यात आले. हे मानवरहित ड्रोन इराणचे असल्याची माहिती गुप्तचर अधिकाऱ्यांना मिळाल्याचे संरक्षण विभागाने सांगितले. हे हवाई हल्ले सीरियामध्ये अलीकडे सैन्याविरुद्धच्या करण्यात आलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केले गेले असे ऑस्टिन यांनी सांगितले. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या यांच्या निर्देशानुसार हले करण्यात आले. राष्ट्राध्यक्षांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करू असेही ऑस्टिन म्हणाले.
सीरियातील देर एझ-झोर भागामध्ये या हल्ल्यानंतर स्फोट झाले आहेत. देइर एझ-झोर हा इराकच्या सीमेला लागून असलेला मोक्याचा प्रांत आहे. त्यात तेलाचे क्षेत्रही आहे. इराण समर्थित मिलिशिया गट आणि सीरियन सैन्य या प्रदेशावर नियंत्रण ठेवतात. काही दिवसांपूर्वीच इराणच्या पुरवठा मार्गांना लक्ष्य करून इस्रायलकडून संशयास्पद हवाई हल्ले करण्यात आले होते.
हे ही वाचा:
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उत्तराखंडमध्ये
आज हुतात्मा दिन! याच दिवशी दिली होती भगत, सिंह, राजगुरू, सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
सीरियातील ड्रोन हल्ले इराणच्या पॅरामिलिटरी रिव्होल्युशनरी गार्डने केले असल्याचे मानले जात आहे. अलिकडच्या काही महिन्यांत रशियाने कीववरील युद्धाचा भाग म्हणून युक्रेनमधील हल्ल्यांमध्ये इराणी ड्रोन वापरण्यास सुरुवात केली आहे.