काबूल एअरपोर्टच्या दिशेने सोडण्यात आलेली पाच विध्वंसक रॉकेट अमेरिकेने निकामी केली. हल्ल्याच्या दृष्टीने ही पाच रॉकेट काबूल विमानतळाच्या दिशेने सोडण्यात आली होती. मात्र अमेरिकेच्या डिफेन्स मिसाईल सिस्टिमने आधीच धोका ओळखून, या रॉकेटचा हल्ला होण्यापूर्वीच ती निकामी केली. अमेरिकेने हा हल्ला परतवल्याने मोठा अनर्थ टळला. इंटरसेप्ट अर्थात आपल्या दिशेने येणारे रॉकेट किंवा मिसाईलचा शोध घेऊन, त्यावर कारवाई करणं.
अमेरिकन सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही हे रॉकेट निकामी केली आहेत. पण ती सर्वच्या सर्व निकामी झाली आहेत की नाही याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. सोमवारी सकाळी हे हल्ले झाले होते.
Afghanistan: As many as five rockets were fired at Kabul airport but were intercepted by a missile defense system, reports Reuters quoting a US official
— ANI (@ANI) August 30, 2021
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान यांच्या मते, या हल्ल्याची माहिती राष्ट्रपती जो बायडन यांनाही देण्यात आली आहे. दरम्यान, अमेरिकेने रविवारी काबूलमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले. यामध्ये एका आत्मघाती हल्लेखोरालाही टार्गेट करण्यात आलं. हा हल्लेखोर काबूल विमानतळावर हल्ला करण्याच्या तयारीत होता, असं सांगण्यात येत आहे.
अमेरिकेच्या मते, काबूल एअरपोर्टवर आयसिसचे दहशतवादी पुन्हा हल्ला करु शकतात. अमेरिकन सैन्य त्यांच्या रडारवर आहे. हे सैन्य सध्या काबूलमध्येच आहे. अमेरिका आपल्या सैन्याला ३१ ऑगस्टपूर्वी तिथून हटवण्याच्या तयारीत आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एका मोठ्या स्फोटानं हादरलीय. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएसआयएस-केनं आठवड्याभरात सलग दुसरा हल्ला केलाय. एक रॉकेट काबूल एअरपोर्टच्या दिशेनं सोडण्यात आलं. अर्थात टार्गेटवर अमेरीकन सैनिक आणि जिथून अमेरीकन विमानं उड्डान भरतायत तो भाग होता. पण हे हल्ला करण्यात आलेलं रॉकेट लक्ष्य भेदू शकलं नाही आणि ते रॉकेट जवळच्याच निवासी भागात कोसळलं.
हे ही वाचा:
औरंगजेब म्हणत आहे, इम्रान खान सरकार खोटारडे
‘या’ शिवसेना खासदारावर ईडीचे छापे
ठाकरे सरकारची गळचेपी फार काळ चालणार नाही
इसिसिनं आधी काबूल एअरपोर्टवर हल्ला केला, ज्यात १६९ अफगाण नागरीक आणि १३ अमेरीकन सैनिकांचा बळी गेला. त्याचा बदला म्हणून अमेरीकेनं इसिसिच्या ठिकाण्यांवर ड्रोन हल्ला केला. परत याचा बदला म्हणून इसिसिनं हल्ला केल्याचं वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार दोन जणांना जीव गमवावा लागलाय. काही जण जखमी आहेत. मृत आणि जखमींमध्ये मुलं आणि महिलांचा समावेश आहे. एअरपोर्टकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून १ कि.मी. अंतरावर हा हल्ला केला गेलाय.