पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याला मोठे यश मिळाले आहे. तस्करीच्या माध्यमातून परदेशात गेलेल्या भारतीय संस्कृतीशी संबंधित २९७ मौल्यवान अमेरिकेने भारताला परत केल्या आहेत. या पुरातत्त्वीय वस्तू अवैध तस्करीच्या माध्यमातून अमेरिकेत पोहोचल्या होत्या. दरम्यान, २०१४ पासून भारताने परदेशातून ६४० प्राचीन वस्तू परत मिळविल्या आहेत, यामध्ये एकट्या अमेरिकेने ५७८ प्राचीन वस्तू भारताला परत केल्या आहेत.
पुरातन वास्तू परत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अमेरिकन सरकार आणि बिडेन यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीटकरत म्हणाले की, “सांस्कृतिक संपर्क अधिक मजबूत करणे आणि सांस्कृतिक मालमत्तेच्या अवैध तस्करीविरूद्ध लढा मजबूत करणे. भारताला २९७ मौल्यवान पुरातन वास्तू परत करणे सुनिश्चित केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि यूएस सरकारचा अत्यंत आभारी आहे.”
हे ही वाचा :
मुुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुका आज रविवारी; मुंबई उच्च न्यायालयाने दिला आदेश
आमदार अतुल भातखळकरांनी दिले लक्ष्मीच्या पंखांना बळ!
पटना NIT मध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वातावरण गढूळ, विद्यार्थ्यांनी पुकारले आंदोलन!
अंबानींचा ‘अँटिलिया’ वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधला आहे: फरार आरोपी झाकीर नाईक!
याआधीही अमेरिकेने भारताला अनेक प्राचीन वस्तू परत केल्या आहेत. २०२१ मध्ये पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान २५७ वस्तू आणि २०२३ मध्ये १०५ वस्तू, अशाप्रकारे अमेरिकेने भारताला आतापर्यंत ५७८ प्राचीन वस्तू परत केल्या आहेत. गेल्या १० वर्षात भारत आपला प्राचीन खजिना परत मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याचा परिणामही दिसत आहेत. हे सर्व पंतप्रधान मोदींमुळे शक्य होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.