कोरोना विषाणू संसर्गानं अमेरिकेचे कंबरड मोडलं आहे. अमेरिकेत दिवसाला १ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसात १ लाख ते दीड लाखांच्या सरासरीनं रुग्ण वाढ होत आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातील कोरोनाचा विस्फोट संपूर्ण जगासाठी चिंता वाढवणारा आहे. अमेरिकेत सध्या १ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
U.S. COVID update: Number in hospital drops for 2nd day in a row
– New cases: 100,947
– Average: 159,770 (+1,080)
– In hospital: 100,789 (-530)
– In ICU: 25,552 (-75)
– New deaths: 683More data: https://t.co/YDZSbYO7l7
— BNO Newsroom (@BNODesk) August 29, 2021
शनिवारी अमेरिकेत १ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या ३ कोटी ९१ लाख ५४ हजार २६९ वर पोहोचली आहे. तर देशात आतापर्यंत ६ लाख ३७ हजार ३१४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या सात दिवसात अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत ७ टक्के वाढ दिसून आली आहे. तर, मृतांच्या संख्येत २८ टक्के वाढ झाली आहे. अमेरिकेतील हे चित्र नक्कीच जगाचं टेन्शन वाढवणार आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असलं तरी वाढती रुग्णसंख्या संपूर्ण जगाासाठी चिंतेंचं ठरलं आहे.
अमेरिकेत जानेवारी २०२१ नंतर कोरोना रुग्णांच्या संख्येनं १ लाखांचा टप्पा ओलांडला नव्हता. मात्र, ऑगस्ट महिन्यात १ लाखांपेक्षा अधिक रुग्णसंख्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर देखील उपाचाराचा ताण येत आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेच्या रॉकेटने काबुल विमानतळावरील अनर्थ टळला
औरंगजेब म्हणत आहे, इम्रान खान सरकार खोटारडे
‘या’ शिवसेना खासदारावर ईडीचे छापे
ठाकरे सरकारची गळचेपी फार काळ चालणार नाही
कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावार वाढ होत आहे. या संसर्गाचं कारण डेल्टा वेरिएंट सांगितलं जात आहे. मात्र, डॉक्टर आणि संशोधकांचं एक निरीक्षण समोर आलं आहे. कोरोनामुळं रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये कोरोना लस न घेतलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील रुग्णसंख्येच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या अधिक असून परिस्थिती खराब असल्याचं देखील एफडीएच्या पॅनेलवरील सदस्यांनी डॉक्टरांनी सांगितलं आहे. जून महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याचंही दिसून आइलं आहे.