24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियापुतीनना भेटलात, मग भोगा कर्माची फळे

पुतीनना भेटलात, मग भोगा कर्माची फळे

Google News Follow

Related

पूर्व युक्रेनमध्ये रशियन सैन्याकडून सुरू असलेल्या “विशेष लष्करी कारवाई” दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी क्रेमलिनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली होती. भेट घेतल्यानंतर काही तासाच, अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानला (NBP) दंड ठोठावला आहे.

यूएस फेडरल रिझर्व्ह, देशाची मध्यवर्ती बँक आणि न्यूयॉर्क राज्याच्या वित्तीय सेवा अधीक्षकांनी कमतरता आणि फेडरल कायद्यांचे पालन न केल्याबद्दल पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेवर दंड ठोठावला आहे. या दंडाची रक्कम सुमारे ५५ दशलक्ष डॉलर्स आहे. यामध्ये फेडरल रिझर्व्हने २०.४ दशलक्ष डॉलर्स तर न्यू यॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने एनबीपीला ३५ दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठवला आहे.

४ मार्च २०२१ रोजी केलेल्या तपासणीच्या आधारे जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, एनबीपीने १६ मार्च २०१६ रोजी अधिकाऱ्यांसोबत “उणिवा” दुरुस्त करण्यासाठी लेखी करार केला होता. तथापि, अलीकडील तपासणीत असे आढळून आले आहे की एनबीपी लिखित करारातील प्रत्येक तरतुदीचे पूर्ण पालन करण्यात अपयशी ठरले आहे.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यकवि गोविंद यांच्या कविता’चे स्वा. सावरकर आत्मार्पण दिनी प्रकाशन

अडकलेल्या विद्यार्थ्यांना सूचना गाड्यांवर तिरंगा लावा

‘या’ बातमीमुळे अदानी पॉवरचे शेअर्स झपाट्याने वाढले…

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची लवकरच सुटका

आदेशात असेही नमूद करण्यात आले आहे की, पाकिस्तानचे एनबीपी यूएस कायद्यांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्याने, पाकिस्तानची मध्यवर्ती बँक आणि फेडरल रिझर्व्ह यांनी सिव्हिल मनी पेनल्टीच्या मुल्यांकनाच्या या आदेशात प्रवेश करण्यास परस्पर सहमती दर्शविली होती. यूएस फेडरल रिझर्व्हने एनबीपीला कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि मॅनेजमेंट ओव्हरसाइटवर सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एनबीपीला त्यांच्या शिफारस आदेश ६० दिवसांच्या आत लागू करण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय एनबीपीला दहा दिवसांच्या आत एक अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले आहे जो रिझव्‍‌र्ह बँकेच्या लेखी योजनांना “समन्वय आणि सबमिट करण्यासाठी जबाबदार” असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा